यावर्षी जागतिक क्रिकेटमधील तब्बल ७ कर्णधारांनी क्रिकेटच्या वेगवेगळ्या प्रकारातून कर्णधार म्हणून निवृत्ती घेतली आहे. परंतु हे सर्व क्रिकेटपटू आजही जागतिक क्रिकेट खेळत आहेत हे विशेष!
भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळख असणाऱ्या एमएस धोनीने यावर्षी मर्यादित षटकांचा कर्णधार म्हणून भारतीय संघाचा राजीनामा दिला. परंतु याच दोन प्रकारात तो भारतीय संघाचा नियमित सदस्य आहे.
इंग्लंड संघाचा कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने नेतृत्व केलेल्या अॅलिस्टर कूकने यावर्षी कसोटी कर्णधार पदाचा राजीनामा दिला. परंतु ह्या प्रकारात तो क्रिकेट खेळत राहणार आहे.
अझहर अली हा पाकिस्तानचा मर्यादित षटकांचा कर्णधार म्हणून २०१७ पर्यंत जबाबदारी पार पाडत होता परंतु कर्णधार म्हणून आलेल्या अपयशामुळे त्यानेही यावर्षी राजीनामा दिला.
मशरफी मुर्तझाने यावर्षी बांगलादेशच्या टी२० कर्णधार पदाचा राजीनामा दिला. परंतु बांगलादेश संघाचा वनडे कर्णधार म्हणून जबाबदारी पार पडणार आहे. यावर्षी राजीनामा देणाऱ्या कर्णधारांमध्ये कोणत्याही एका क्रिकेटच्या प्रकारात कर्णधारपद कायम ठेवणारा मुर्तझा एकमेव खेळाडू आहे.
मिसबाह उल हक या पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूने यावर्षी कर्णधार तसेच खेळाडू म्हणून यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यावर्षी राजीनामा दिलेला तो एकमेव असा कर्णधार आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुढे सुरु ठेवणार नाही.
अंजेलो मेथेव याने झिम्बाब्वे विरुद्ध झालेल्या पराभवानंतर क्रिकेटच्या सर्व प्रकारातून कर्णधार म्हणून राजीनामा दिला. परंतु त्याने श्रीलंका संघाकडून क्रिकेट खेळणे कायम ठेवले आहे.
एबी डीविल्लीअर्सने आफ्रिकेचा वनडे कर्णधार म्हणून काल निवृत्ती जाहीर केली. बाकी प्रकारातून कर्णधार म्हणून तो यापूर्वीच निवृत्त झाला आहे. परंतु तोही आपले आंतरारष्ट्रीय कारकीर्द सुरु ठेवणार आहे.