प्रीमियर लीगमध्ये आज कार्डिफ सिटी विरुद्ध न्युकॅसल सामना अनिर्णीत राहिला. सामन्याची पूर्ण वेळ झाल्यावर अधिक वेळेत सिटीचा गोलकिपर नील एथेर्जने न्युकॅसलच्या केनेडीने केलेली पेनाल्टी रोखली.
पहिल्या सत्रात एकही गोल न झाल्याने दुसऱ्या सत्रात सिटीच्या सिटी संघाचे खेळाडू आक्रमक खेळत होते. दुसऱ्या सत्राच्या 54व्या मिनिटाला जोइ राल्सने केनेथ झोहोरला दिलेल्या हेडर शॉटमध्ये गोल करण्याची संधी होती पण त्याने ती चुकवली.
न्युकॅसल हा पहिल्या सामन्यात टोटेनहॅम हॉटस्पर विरुद्ध 2-1 तर सिटी बोर्नेमाऊथ विरुद्ध 2-0 असे पराभूत झाले होते. म्हणून दोन्ही संघाना हा सामना जिंकणे जरूरी होते.
यामध्ये सिटीचा जोशुआ मर्फी आणि न्युकॅसलचा जॅकब मर्फी हे जुळे भाऊ एकमेंकाविरुद्ध खेळले. महत्त्वाच्या सामन्यात पहिल्यांदाच खेळणारे मर्फी बंधू हे मायकल आणि विल कीनेनंतर खेळणारे दुसरेच जुळे भाऊ आहेत.
जॅकबने मागील वर्षीच न्युकॅसलशी 12 मिलियन पौंडमध्ये करार केला. तर जोशुआने सिटीशी 11 मिलियन पौंडचा करार केला.
तसेच या लीगमधील न्युकॅसलने सिटी विरुद्ध 10 सामने जिंकले आहेत. ही त्यांची एतिहासिक कामगिरी ठरली.
पुढील सामने न्युकॅसलचा चेल्सी विरूद्ध तर सिटीचा हडर्सफिल्ड विरुद्ध आहे.