पॅरिस ऑलिम्पिक नुकतेच संपले. तत्पूर्वी यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला (Vinesh Phogat) 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे अंतिम फेरीत अपात्र ठरवले होते. त्यानंतर तिनं रौप्य पदकासाठी सीएएसकडे अपील केलं होतं. त्याचा निकाल आज जाहीर होणार होता. मात्र, कोर्टानं त्याची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलली आणि ती (16 ऑगस्ट) केली आहे.
विनेशनं रौप्य पदकासाठी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (CAS) मध्ये अपील केले होते. या प्रकरणावर सीएएसनं 9 ऑगस्ट रोजी सुनावणी केली. यावेळी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचं ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी विनेशची बाजू मांडली होती. जास्त वजनामुळे विनेशला अपात्र ठरवण्यात आले. तिचं वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. आता विनेश संयुक्त रौप्यपदकाची मागणी करत आहे.
विनेश फोगटनं (Vinesh Phogat) उपांत्य फेरीत क्यूबन कुस्तीपटू गुझमन लोपेझचा पराभव केला होता. युक्रेनच्या ओक्साना लिवाचचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला, तर प्री-क्वार्टर फायनलमध्ये जपानच्या युइ सुसाकीला चितपट केलं होतं. मात्र, सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वीच तिचं वजन 100 ग्रॅम जास्त भरल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-
दिग्गज क्रिकेटरचा नोकरीसाठी क्रिकेटला रामराम, 30 शतके आणि 16 हजारांहून अधिक धावा आहेत नावावर
“बचावात्मक होण्यापेक्षा अपयशी होणे चांगले”, भारतासाठी 744 विकेट्स घेणाऱ्या अश्विनचे विधान
रौप्य पदक मिळणार की नाही? सीएएसच्या निकालापूर्वीच विनेशच्या वकिलानं केला मोठा खुलासा