पुणे ।शाळेत शिक्षण घेत असताना ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना आपण ऐकत आलो. आजमितीस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडामंत्री राजवर्धनसिंह राठोड यांच्या पुढाकाराने ही संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. खेलो इंडियाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातील हिरे आपल्याला गवसले असल्याची भावना महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली.
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनातर्फे पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीत शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया स्पर्धेंतर्गत राष्ट्रीय युवा को-आॅपरेटिव्ह सोसायटीतर्फे आयोजित स्पोर्टस् एक्सपोमध्ये सर्व राज्याच्या पथक प्रमुखांचा आणि मागील वर्षी खेलो इंडियामध्ये पदकप्राप्त महाराष्ट्रातील खेळाडूंचा प्रोत्साहनपर विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे उपमहासंचालक संदीप प्रधान, राज्याचे क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, संयोजन समितीचे प्रमुख राजेंद्र पवार, क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल, सोसायटीचे चेअरमन राजेश पांडे, क्रीडा मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक श्रीपाद ढेकणे, पराग सिधये, आशिष पेंडसे आदी उपस्थित होते.
विनोद तावडे म्हणाले, खेळाडूंना स्पर्धेपर्यंत पोहोचविण्यासोबतच त्यांच्या संपूर्ण प्रवासात प्रशिक्षक आणि पथकप्रमुखांची महत्त्वाची भूमिका असते. राज्याच्या क्रीडा विभागाने या स्पर्धेचे अत्यंत कमी वेळात यशस्वी नियोजन केले आहे. कोणतीही कमतरता नियोजनात राहिली नसून इतर राज्यांतून आलेल्या पथकप्रमुख व खेळाडूंनी समाधान यक्त केले असल्याचे त्यांनी सांगितले.
संदीप प्रधान यांनी महाराष्ट्र शासनाने अत्यंत नेटक्या पद्धतीने खेलो इंडिया स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी जिम्नॅस्टिक्स, कथक यासारखे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. आशिष पेंडसे यांनी सूत्रसंचालन केले.
महत्त्वाच्या बातम्या-
–धोनी धोनी है! विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे
–सामनावीर विराट कोहलीकडून गांगुलीच्या त्या खास विक्रमाचीही बरोबरी