---Advertisement---

चहल-धोनी जोडीचा अविस्मरणीय विक्रम…

On: गुरूवार, फेब्रुवारी 22, 2018 3:18 PM
---Advertisement---

सेंच्युरियन। काल पार पडलेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर ६ विकेट्सने विजय मिळवला. पण या सामन्यात भारताकडून एक निराळाच विक्रम पाहायला मिळाला. हा विक्रम एमएस धोनी आणि युझवेंद्र चहल यांनी केला आहे.

कालच्या सामन्यात धोनीने नाबाद ५२ धावा करताना आंतराष्ट्रीय टी २० कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले. तर चहल भारताकडून आंतरराष्ट्रीय टी २० मध्ये एका डावात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज बनला आहे. याआधी हा विक्रम जोगिंदर शर्माच्या नावावर होता. त्याने इंग्लंड विरुद्ध २००७ला ५७ धावा दिल्या होत्या.

विशेष म्हणजे फेब्रुवारी २०१७ मध्ये धोनीने जेव्हा आंतराष्ट्रीय टी२० तील इंग्लंड विरुद्ध कारकिर्दीतील पहिले अर्धशतक केले त्याच सामन्यात चहलने भारताकडून आंतराष्ट्रीय टी २० मध्ये एका डावात सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा विक्रम केला होता. त्याने इंग्लंडविरुद्ध २५ धावात ६ विकेट्स घेतल्या होत्या.

म्हणजेच भारताकडून आंतराष्ट्रीय टी २० मध्ये सर्वोत्तम गोलंदाजीचा आणि सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज असे दोन्ही विक्रम चहलच्या नावावर आहे. त्यातील खास गोष्ट अशी की हे विक्रम ज्या सामन्यात चहलने केले त्या दोन्ही सामन्यात धोनीने अर्धशतके केली आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment