इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने सोमवारी (२० सप्टेंबर), ३१ व्या सामन्यापासून या स्पर्धेत आपल्या मोहिमेला सुरुवात केली आहे. अबू धाबीच्या शेख जायद क्रिकेट स्टेडियमवर आरसीबी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आपला सामना खेळला आहे.
आयपीएलमधील कर्णधार म्हणून कोहलीचा हा शेवटचा हंगाम असेल. कोहली या हंगामानंतर आरसीबीच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. अशावेळी कोहलीचा कर्णधारपद सोडण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला आयपीएल चषक जिंकवून द्यायचा प्रयत्न असेल. दरम्यान, आरसीबीचा लेगस्पिनर युझवेंद्र चहलने विश्वास व्यक्त केला आहे की, कोहली कर्णधारपद सोडण्यापूर्वी आयपीएल २०२१ ला एक खास हंगाम बनवेल आणि १४ वर्षांपासून संघ ज्या गोष्टीची वाट पाहत आहे, ते विजेतेपद घरी आणेल.
एका माध्यमाशी बोलताना चहल म्हणाला, ‘आयपीएल पुन्हा सुरू झाल्याचा मला खूप आनंद आहे. आरसीबीने या हंगामाची खरोखर चांगली सुरुवात केली आहे. आम्हाला आमचे पहिले जेतेपद जिंकण्याची मोठी संधी आहे. मला खात्री आहे की विराट यावेळी आरसीबीला त्यांचे पहिले विजेतेपद मिळवून देईल. विराट आरसीबी आणि भारताचे कर्णधार असताना तो आपल्या मूळ स्वभावा प्रमाणेच राहतो. त्याची विजयाची आणि धावांची भूक आरसीबी आणि भारत दोघांसाठी सारखीच आहे. मी खूप भाग्यवान आहे की, त्याच्या कर्णधारपदाखाली दोन्ही संघांकडून मला खेळता आले.’
आरसीबीला केकेआरविरुद्धचा सामना ९ विकेट्स गमवावा लागला आहे. त्यामुळे आरसीबी सध्या ७ सामन्यांत १० गुणांसह त्यांचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. आयपीएलमध्ये कोहलीचा कर्णधारपदाचा रेकॉर्ड थोडा खराब आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबी संघाने १३३ सामन्यांमध्ये फक्त ६० जिंकले आणि ६६ गमावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई-चेन्नई सामन्यानंतर दिसले ‘झारखंड कनेक्शन’; धोनी-ईशान-रॉय यांचा व्हिडिओ व्हायरल
…म्हणून विराटने आरसीबीचे कर्णधारपद सोडले; खास मित्र स्टेनने सांगितले खरे कारण
आयपीएलमध्ये लखनऊ संघाची जागा पक्की? लवकरच एकाना स्टेडियमवर होणार आंतरराष्ट्रीय सामने