आयपीएल २०२२ मध्ये ८ ऐवजी १० संघ उतरतील. म्हणजेच टी -२० लीगमध्ये संघांची संख्या वाढणार आहे. ऑक्टोबरमध्ये दोन नवीन संघांचा लिलाव होऊ शकतो. डिसेंबर-जानेवारीमध्ये आयपीएल २०२२ साठी खेळाडूंच्य मेगा लिलावाची तयारी केली जात आहे. फ्रँचायझी म्हणून शर्यतीत लखनऊचा संघ आघाडीवर आहे.
एकाना स्टेडियमवर भारतीय संघाने आतापर्यंत फक्त एक आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, भारतीय संघ १८ मार्च २०२२ रोजी लखनऊमध्ये श्रीलंकेविरुद्ध टी -२० सामना खेळेल. म्हणजेच अनेक भारतीय खेळाडू पहिल्यांदाच या मैदानावर उतरू शकतात.
बीसीसीआयच्या या हालचालीमुळे असे मानले जात आहे की बोर्डला आयपीएलपूर्वी मैदानाची तयारी पाहायची आहे. जर आपण निश्चित वेळापत्रकाचा विचार केला तर देशात एप्रिल-मे महिन्यात आयपीएल २०२२ होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत जर लखनऊची फ्रँचायझी तयार झाली, तर या मैदानावर किमान ७ सामने खेळले जातील. दुसऱ्या नवीन संघाच्या शर्यतीत अहमदाबाद आघाडीवर आहे. त्याचे सामने जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम म्हणजेच नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळले जाऊ शकतात.
भारतीय संघाने नोव्हेंबर २०१८ मध्ये एकाना स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध एकमेव टी -२० सामना खेळला होता. म्हणजे सुमारे तीन वर्षांपूर्वी. सामन्यात प्रथम खेळताना भारतीय संघाने २ गडी बाद १९५ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. रोहित शर्माने ६१ चेंडूत नाबाद १११ धावा केल्या होत्या. त्याने ८ चौकार आणि ७ षटकार मारले होते. प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडिजचा संघ ९ गडी गमावत फक्त १२४ धावा करू शकला होता. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.
आयपीएलच्या या दोन संघांच्या लिलावातून बीसीसीआयला मोठा नफा मिळण्याची अपेक्षा आहे. माहितीनुसार, बीसीसीआयला २ संघांच्या लिलावातून सुमारे ६ हजार कोटी मिळू शकतात. याशिवाय आतापर्यंत साखळीत ६० सामने खेळवले जात होते. आता सामन्यांची संख्याही वाढेल. आता आयपीएलमध्ये ७४ ते ९४ सामने खेळले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत, सामन्यांच्या प्रसारणातून मिळणाऱ्या कमाईत देखील वाढ होण्याची अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
एकदिवसीय क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा ‘तो’ जगातील पहिला गोलंदाज, पण खेळला फक्त ८ सामने
इंग्लंडचा पाकिस्तानला ४४० व्होल्टचा झटका; जळफळाट झालेल्या अध्यक्षांचं खेळाडूंना भावनिक आवाहन






