---Advertisement---

ENG vs PAK: पाकविरुद्ध जो रूट इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर! सचिन तेंडुलकरचा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड मोडणार?

On: बुधवार, सप्टेंबर 9, 2026 6:35 PM
---Advertisement---

बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर 9 सप्टेंबरपासून पाकिस्तान आणि इंग्लंड (ENG vs PAK) यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना सुरू झाला आहे. जो रूट (Joe Root) या सामन्यात आपला 169वा कसोटी सामना खेळत आहे. यासोबतच त्याने ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह वॉ आणि रिकी पाँटिंग यांना मागे टाकले आहे. या दोघांनी आपल्या कारकिर्दीत प्रत्येकी 168 कसोटी सामने खेळले होते. रूट आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

जो रूटने डिसेंबर 2012 मध्ये भारताविरुद्ध नागपूर कसोटी सामन्यातून आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती. जवळपास 14 वर्षांच्या कारकिर्दीत तो इंग्लंडच्या प्रमुख फलंदाजांपैकी एक राहिला आहे. आता त्याच्याकडे सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मोठा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची शानदार संधी आहे.

खरं तर, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड सध्या सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्या नावावर संयुक्तपणे आहे. दोन्ही फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येकी 68 अर्धशतके केली आहेत. त्यामुळे एजबेस्टन कसोटीत रूटने एक अर्धशतक झळकावताच तो सचिनला मागे टाकेल आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारा फलंदाज बनेल. रूटसाठी ही कामगिरी विशेष असेल, कारण सचिनने आपल्या 200 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत हा विक्रम केला होता.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारे फलंदाज:

  • सचिन तेंडुलकर – 68
  • जो रूट – 68
  • शिवनारायण चंद्रपॉल – 66
  • राहुल द्रविड – 63
  • ॲलन बॉर्डर – 63
  • रिकी पाँटिंग – 62

एजबेस्टन कसोटी सामना रूटसाठी आणखी खास ठरत आहे. कारण, इंग्लंडमध्ये तिन्ही फॉरमॅट मिळून हा रूटचा 200वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. इंग्लंडमध्ये खेळलेल्या सामन्यांमध्ये रूटने आतापर्यंत 11,928 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. 12,000 धावा पूर्ण करण्यासाठी त्याला आता फक्त 72 धावांची गरज आहे.

जर रूटने हा टप्पा गाठला, तर आपल्या देशात 12,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा तो जगातील सहावा फलंदाज ठरेल. या यादीत सचिन तेंडुलकर सर्वात पुढे आहे. सचिनने 1989 ते 2013 या काळात भारतात तिन्ही फॉरमॅटमध्ये 258 सामने खेळून 14,192 धावा केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या देशात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज:

  • सचिन तेंडुलकर – 14,192
  • रिकी पाँटिंग – 13,117
  • विराट कोहली – 12,780
  • जॅक कॅलिस – 12,305
  • कुमार संगकारा – 12,043
  • जो रूट – 11,928

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---