---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्जचा हा खेळाडू दोन आठवड्यांसाठी आयपीएलला मुकणार

On: रविवार, एप्रिल 29, 2018 9:21 PM
---Advertisement---

पुणे। काल चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स पार पडलेल्या सामन्यात मुंबईने  ८ विकेट्सने विजय मिळवत चेन्नईला पराभवाचा धक्का दिला.

त्याचबरोबर चेन्नईला या सामन्यात आणखी एक धक्का बसला तो त्यांचा वेगवान गोलंदाज दिपक चाहरला झालेल्या दुखापतीमुळे. चाहरला या सामन्यातील त्याचे तिसरे षटक टाकत असताना हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला. यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. त्याचे हे षटक हरभजन सिंगने पूर्ण केले.

या  हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळेच त्याला आता दोन आठवड्यांसाठी आयपीएलला मुकावे लागण्याची शक्यता आहे.याबद्दलची माहिती चेन्न्ईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सामना संपल्यावर पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, “त्याला पूर्वीही हॅमस्ट्रिंगच्या दुखापती झाल्या आहेत.  त्याला कधी त्रास होतो याची त्याला चांगली कल्पना आहे.  त्यामुळे त्याला पुढील दोन आठवड्यांसाठी आयपीएलला  मुकावे लागण्याची शक्यता आहे. ज्यामुळे थोडा धक्का बसला आहे. “

चाहरने 22 एप्रिलला सनरायझर्स हैद्राबाद विरूद्ध झालेल्या सामन्यात 3 विकेट्स मिळवून चेन्नईच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्याने आत्तापर्यंत यावर्षी आयपीएलमध्ये 7 सामन्यात 6 विकेट्स घेतल्या आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2018: बेंगलोर की कोलकाता, विजयाच्या मार्गावर कोण परतणार?

– राफेल नदालने क्ले कोर्टवरील 400 वा विजय साजरा करत रचला मोठा विक्रम

ऑस्ट्रेलियाच्या या शहरातून मिळाले ३ विश्वचषक विजेते खेळाडू

IPL 2018: आज राजस्थान-हैद्राबाद आमने-सामने

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४- दैव देते, कर्म नेते!!

‘कॅप्टन कूल’ एमएस धोनीने केला हा खास विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment