पुणे। मुंबई उपनगर टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित व सुहाना प्रायोजितएमएसएलटीए सुहाना स्मार्ट 10वर्षांखालील टेनिस सर्किट या स्पर्धेच्या मुंबई लीग स्पर्धेत मुलींच्या गटात मुंबईच्या तमन्ना नायर हिने तर, मुलांच्या गटात मुंबईच्या आरव छल्लाणी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
प्रकटेनिस अंधेरी येथील टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या दोन दिवसीय स्पर्धेत मुलींच्या गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित मुंबईच्या तमन्ना नायरने अव्वल मानांकित पुण्याच्या सृष्टी सूर्यवंशीचा 4-0, 2-4, 5-3असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. तमन्ना हि सुलोचनादेवी सिंघानिया शाळेत शिकत आहे. याआधीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत अव्वल मानांकित सृष्टी सूर्यवंशीने पाचव्या मानांकित समीक्षा शेट्टीचा 6-0 असा तर, दुसऱ्या मानांकित तमन्ना नायरने तिसऱ्या मानांकित मायरा शेखचा 6-0 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
मुलांच्या गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित आरव छल्लाणी याने अव्वल मानांकित अधिराज दुधानेचा 5-3, 4-0 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. आरव हा नेरुळ येथील दिल्ली पब्लिक शाळेत पाचवी इयत्तेत शिकत असून बिलीफ टेनिस अकादमीत प्रशिक्षक गोटेश अवस्थी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीए सुपरवायझर सोनल वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले.
निकाल: मुली: उपांत्य फेरी:
सृष्टी सूर्यवंशी[1] वि.वि.समीक्षा शेट्टी[5] 6-0;
तमन्ना नायर[2]वि.वि.मायरा शेख[3] 6-0;
अंतिम फेरी: तमन्ना नायर[2]वि.वि.सृष्टी सूर्यवंशी[1] 4-0, 2-4, 5-3;
मुले: उपांत्य फेरी:
अधिराज दुधाने[1] वि.वि.वीर चतुर[3] 6-4
आरव छल्लाणी[2] वि.वि.आरव शहा[15] 6-2;
अंतिम फेरी: आरव छल्लाणी[2] वि.वि.अधिराज दुधाने[1] 5-3, 4-0.
महत्त्वाच्या बातम्या –
वनप्लस करंडक चॅम्पियनशीप सिरीज: चार मानांकित खेळाडू पराभूत
उच्चशिक्षित भारतीय शिलेदार, ज्याची डिग्री अशी की इस्त्रो किंवा नासामध्ये लागली असती नोकरी; पण…