आयपीएलच्या 17 व्या हंगामाला दमदार सुरवात झाली असून आयपीएल 2024 च्या सहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्जचा सामना होणार आहे. तसेच हा सामना एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे. तर या सामन्यात आरसीबीचा पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसरीकडे पंजाबने पहिला सामना जिंकला आहे. तर आज आपण आरसीबी आणि पंजाब किंग्जच्या हेड-टू-हेड आकडेवारीवर सामन्याआधी एक नजर टाकणार आहोत.
याबरोबरच आजपर्यंतच्या आयपीएल इतिहासात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास पंजाबचा संघ आरसीबीवरती वर्चस्व गाजवत आहे. परंतु दोन्ही संघाच्या रेकॉर्डमध्ये फारसा काही फरक जाणवत नाही. तसेच आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघ आतापर्यंत 31 वेळा आमनेसामने आले आहेत. तर या कालावधीत पंजाब किंग्जने 17 सामने जिंकले आहेत. तसेच आरसीबीने 14 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आरसीबी सोमवारी पराभवाचे अंतर कमी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करताना दिसणार आहे.
“Change is constant, change is good. It shapes our journey as it should!”
What has changed in the lives of Royal Challengers since the last IPL, on @bigbasket_com presents Bold Diaries. 📽️#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 pic.twitter.com/EndazKdOLK
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 24, 2024
दरम्यान, आयपीएल 2024 मधील पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास, चेन्नई सुपर किंग्जने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात आरसीबीचा 6 गडी राखून पराभव केला आहे. तर दुसरीकडे पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 4 गडी राखून पराभव केला आहे. यामुळे हा सामना अत्यंत चुरशीचा होण्याची दाट शक्यता आहे.
घ्या जाणून पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची हेड टू हेड आकडेवारी
एकूण सामने :- 31
पंजाब किंग्ज जिंकलेले सामने :- 17 सामने
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू जिंकलेले सामने :- 14 सामने
महत्त्वाच्या बातम्या-
- राहुल आला… खेळला, पण हरला; घरच्या मैदानावर राजस्थानचा लखनऊ सुपर जायंट्सवर दणदणीत विजय
- मुंबई इंडियन्सने जिंकला टॉस, घेतला ‘हा’ निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग 11