---Advertisement---

टी20 आशिया चषकात शतक ठोकणारी पहिली महिला क्रिकेटपटू, दिग्गज मिताली राजचा विक्रम मोडला

On: सोमवार, जुलै 22, 2024 5:20 PM
---Advertisement---

श्रीलंकेची कर्णधार आणि दिग्गज फलंदाज चमारी अटापट्टूनं इतिहास रचला आहे. ती महिला टी20 आशिया कपच्या इतिहासात शतक झळकावणारी पहिली फलंदाज ठरली आहे. तिनं भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राजचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढला. मिताली आतापर्यंत टी20 आशिया चषक स्पर्धेत सर्वात मोठी खेळी खेळणारी फलंदाज होती, मात्र आता हा विक्रम चमारी अटापट्टूच्या नावावर नोंदवला गेला आहे.

चमारी अटापट्टूनं टी20 आशिया चषक 2024 च्या ग्रुप बी सामन्यात मलेशियाविरुद्ध 63 चेंडूत शतक पूर्ण केलं. या सामन्यात तिनं 69 चेंडूत नाबाद 119 धावा ठोकल्या. ही टी20 आशिया कपच्या इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी एकाही फलंदाजानं शतकही ठोकलं नव्हतं. भारताच्या मिताली राजनं 2018 मध्ये मलेशियाविरुद्ध 97 धावांची नाबाद इनिंग खेळली होती. या यादीत तिसऱ्या स्थानावर श्रीलंकेची हर्षिता समरविक्रमा आहे, जिनं 2022 टी20 आशिया कप सामन्यात थायलंडविरुद्ध 81 धावांची खेळी खेळली होती.

डावखुरी फलंदाज चमारी अटापट्टू हिच्या नावावर यापूर्वीच अनेक विक्रम आहेत. ती श्रीलंकेसाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3000 हून अधिक धावा करणारी एकमेव खेळाडू आहे. आश्चर्याचं म्हणजे, अद्याप एकाही फलंदाजानं 1500 धावा पार केल्या नाहीत. चमारी अटापट्टू श्रीलंकेची एकमेव फलंदाज आहे, जिनं टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 शतकं झळकावली आहेत. याशिवाय एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही तिच्या नावावर अनेक विक्रम आहेत.

श्रीलंका विरुद्ध मलेशिया सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, श्रीलंकेनं मलेशियाचा 144 धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं 20 षटकांत 4 गडी गमावून 184 धावा केल्या होत्या. प्रत्त्युत्तरात, मलेशियाचा संघ 19.5 षटकांत 40 धावांवर ऑलाऊट झाला.

महत्त्वाच्या बातम्या – 

गिल-यशस्वी ओपनिंग, रिंकू-दुबे फिनिशिंग; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 ची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?
‘तात्या’ पोलार्डचा भयंकर शॉट, स्टेडियममधील महिला चाहती जखमी! माफी मागतानाचा VIDEO व्हायरल
‘फॅब फोर’च्या शर्यतीत विराट पडला मागे, जो रुटची मोठी आघाडी; लारा-द्रविडचा विक्रमही धोक्यात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---