चॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू असे मत बार्सिलोना स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीने व्यक्त केले आहे. मागील तीन वर्ष रियल माद्रिदच हे विजेतेपद पटकावत आहे.
“ही चॅम्पियन लीग जिंकण्यासाठी काहीही करू” असे मेस्सी म्हणाला.
बार्सिलोना २००६, २००९, २०११ आणि २०१५ला चॅम्पियन्स लीग जिंकला आहे. तर रियलने सर्वाधिक १३ विजेतेपद पटकावले आहे.
“यावर्षीचा संघ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे. तसेच आता जे नवीन खेळाडू आले आहेत त्यांची ही मदत होईल”, असे मेस्सीने म्हटले आहे. आताच बार्सिलोनाने बोसा ज्युनियर विरूद्धच्या सामन्यात ३-०ने पराभूत केले.
“मागील हंगामात आम्ही ला लीगा आणि कोपा डेल रे जिंकले असून हा आमच्यासाठी उत्तम हंगाम ठरला. पण चॅम्पियन्स लीगच्या उंपात्यपूर्व सामन्यत पराभूत झाल्याने स्पर्धेतून बाहेर पडलो”, असे मेस्सी म्हणाला.
“आम्हाला आंद्रेसची खूप आठवण येईल. कर्णधार झाल्याने त्या पदाची जबाबदारी कशी असते ते चांगलेच माहित आहे”, असेही तो पुढे म्हणाला.
🤩 Leo #Messi 💪
👑 The words of our captain 🙌
🔵🔴 #ForçaBarça pic.twitter.com/qJYgPa1fIR— FC Barcelona (@FCBarcelona) August 16, 2018
बोसा ज्युनियर विरूद्धच्या सामन्यात मेस्सी बरोबरच बोरडॉक्सकडून आलेला ब्राझिलियन मॅलकोमने पहिला गोल केला होता. तर रफिन्हाने तिसरा गोल केला.
तसेच बार्सिलोनाने रविवारीच( १२ ऑगस्ट) स्पॅनिश सुपर कपमधील अंतिम सामन्यात सेविलचा २-१ असा पराभव केला.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–प्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी
–तब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल