नेदरलँडमध्ये पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आॅस्ट्रेलियाने पेनल्टी शुटआऊटमध्ये भारतावर मात करत विजेतेपद मिळवले. आॅस्ट्रेलियाचे हे 15 वे चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद आहे.
60 मिनिटाच्या पूर्णवेळानंतरही सामना 1-1 असा बरोबरीत राहिल्याने पेनल्टी शुटआऊटमध्ये गेला. मात्र पेनल्टी शुटआऊटमध्ये आॅस्ट्रेलियाने भारताला 3-1 अशा फरकाने पराभूत केले.
भारताकडून फक्त मनप्रीत सिंगला पेनल्टी शुटआऊटमध्ये गोल करण्यात यश आले. तर आॅस्ट्रेलियाकडून अरन झलावेस्की, डॅनियल बेले आणि जेरेमी एडवर्ड्स यांनी गोल करत आॅस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला.
एडवर्ड्सने गोल करण्याआधी भारताचा कर्णधार आणि गोलकिपर श्रीजेशने मॅथ्यू स्वान आणि टॉम क्रेगला गोल करण्यापासुन अडवले होते. मात्र भारताकडून सरदार सिंग, हरमनप्रीत सिंग आणि ललित उपाध्याय यांना शुटआऊटमध्ये गोल करण्यात अपयश आल्याने भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
तत्पुर्वी सामन्याच्या दुसऱ्या सत्रात 24 व्या मिनिटाला गोवर ब्लेकने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत आॅस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली होती. पण ही आघाडी भारतानेही जास्त काळ टिकू दिली नाही. तिसऱ्या सत्रात 42 व्या मिनिटाला विवेक सागरने गोल करुन भारताला बरोबरी साधून दिली.
त्याआधी 13 व्या मिनिटाला भारताला पहिला गोल नोंदवण्याची संधी मिळाली होती परंतू दिलप्रीत सिंगने केलेल्या पासवर एसव्ही सुनिलने गोल करण्याची संधी दवडली.
मात्र शेवटच्या सत्रात दोन्ही संघाकडून चांगली लढत बघायला मिळाली. 45 व्या मिनिटाला मनप्रीतने गोलपोस्टच्या दिशेने मारलेला चेंडू आॅस्ट्रेलियाचा गोलकिपर लोवेलने आडवला. त्याचबरोबर त्याने 53 व्या मिनिटाला दिलप्रीतने मारलेलाही चेंडू आडवला. त्यामुळे भारताला आघाडी घेण्यात अपयश आले.
अखेर शेवटच्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने सामना 1-1 असा बरोबरीचा झाल्याने शुटआऊटमध्ये गेला.
या स्पर्धेत साखळी फेरीतही भारताला आॅस्ट्रेलियाकडूनच पराभव स्विकारावा लागला होता. या सामन्याआधी या स्पर्धेत भारत एकमेव पराभवाला सामोरा गेला होता.
2016 मध्ये पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतही अंतिम सामन्यात भारत पेनल्टी शुटआऊटमध्येच आॅस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता. आॅस्ट्रेलियाने याआधी1983, 1984, 1985, 1989, 1990, 1993, 1999, 2005, 2008, 2009, 2010, 2011, 2012, 2016 या साली चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले आहेत.
यावर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा कर्णधार श्रीजेशला स्पर्धेतील सर्वोत्तम गोलकिपरचा पुरस्कार देण्यात आला आहे.
Congratulations to Indian Men's Team Captain @16sreejesh for earning the award for Best Goalkeeper at the Rabobank Men's Hockey Champions Trophy Breda 2018 after a series of great performances that played a big part in India's run to the Final.#IndiaKaGame #HCT2018 pic.twitter.com/m9DjGjkxkC
— Hockey India (@TheHockeyIndia) July 1, 2018
Silver medal winner @TheHockeyIndia ????@Rabobank #HWC2018
???? @FFUWSP pic.twitter.com/GsSd1U6PjK— International Hockey Federation (@FIH_Hockey) July 1, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–टीम इंडियामध्येही दिसणार पंड्या ब्रदर्स
–महिला हॉकी विश्वचषक: भारतीय संघाचे नेतृत्व राणी रामपालकडे
–मैदानातील या कृत्यामुळे रोनाल्डोने पराभूत झाल्यानंतरही जिंकली चाहत्यांची मने