भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाचवा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात रोहित शर्मा कोरोनाग्रस्त असल्याने भारताचे नेतृत्व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे आले. संघाचे नेतृत्व मिळाल्यानंतर जसप्रीत बुमराहने विशेष कामगिरी केली आहे. गोलंदाजी नव्हे तर यावेळी फलंदाजी करताना बुमराहने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्याने इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टूअर्ट ब्रॉडला एकाच षटकात तब्बल ३५ रन्स चोपले. बुमराहने केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असताना. भाजप महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेसबुक पोस्ट टाकत बुमराहचे विशेष कौतुक केले.
कर्णधार बुमराहने सामन्याच्या पहिल्या डावाच्या ८४व्या षटकात स्टूअर्ट ब्रॉडला तब्बल ३५ रन्स चोपले. याआधी याच स्टूअर्ट ब्रॉड विरुद्ध भारताचा माजी दिग्गज फलंदाज युवराज सिंगने एका षटकात ६ षटकार लगावले होते. चंद्रकांत पाटील यांनी याचा संदर्भ देत थेट सुवराज आणि बुमराहची बरोबरी केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी फेसबुक पोस्ट टाकत “४, ५ वाइड, ७ (नो बॉल आणि सिक्स), ४, ४, ४, ६, १… टी-२० नाही, चक्क टेस्ट मॅचमध्ये हे घडलंय. क्रिकेटच्या इतिहासातली सर्वात महागडी ओव्हर आज इंग्लंडमध्ये टाकली गेली. युवराज सिंगनं ज्याला ६ बॉलमध्ये ६ सिक्स मारल्या होत्या, तोच स्टुअर्ट ब्रॉड बॉलर होता आणि बॅटसमन?” असं लिहीत बुमराहवर कौतुकाचा वर्षाव केला होता.
https://www.facebook.com/100044536083059/posts/pfbid0kDnKAcmE2hc3fPkGfsok934ywMkFhMSCxjTwsknXYZuKooGZjShStnNbXuJ72EvUl/?d=n
दरम्यान, भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात १० बाद ४१६ धावा केल्या. यावेळी भारतासाठी रिषभ पंतने सर्वाधिक १४८ धावांची खेळी केली. त्यापाठोपाठ रविंद्र जडेजाने १०४ धावा करत भारताला चांगल्या धावांपर्यंत पोहचवले. त्यामुळे आता पहिल्या डावात आघाडी घेण्याची जबाबदारी गोलंदाजांवर असताना जसप्रीत बुमराहनेच इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना बाद करत संघाला मोठे झटके दिले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video: जडेजाने शतक ठोकताच विराटही झाला भलताच खूष, रिऍक्शन पाहून तुम्हीही कराल प्रशंसा
सिटी एफसी पुणे, रायजिंग पुणे एफसी संघ विजयी
आनंदाला उधाण! बुमराहच्या बेधुंद फटकेबाजीचा डगआऊटमध्ये जोरदार जल्लोष, प्रशिक्षकांची रिऍक्शन लक्षवेधी