भारत आणि इंग्लंडचे संघ या शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) चेन्नई येथे चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ करतील. परंतु, इंग्लंडमध्ये हे सामने कोणत्या वाहिनीवर प्रसारित केले जातील, यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, चॅनेल फोर या शर्यतीत आघाडीवर असल्याचे दिसते. इतर कोणत्याही वाहिनीने मोठी बोली न लावल्यास, चॅनेल फोर इंग्लंडचा संपूर्ण भारत दौरा प्रसारीत करणे निश्चित आहे.
पंधरा वर्षानंतर कसोटी सामन्यांचे प्रसारण करेल चॅनेल फोर
भारत आणि इंग्लंड यांच्यातील आगामी मालिका अत्यंत अटीतटीची होण्याची शक्यता आहे. या मालिकेसाठी सध्या चांगली वातावरण निर्मिती झाली आहे. ब्रिटिश माध्यमांच्या वृत्तानुसार, ‘चॅनल फोरला प्रसारण अधिकार मिळाल्यास ते १५ वर्षानंतर इंग्लंडच्या कसोटी सामन्यांचे प्रसारण करतील. यासह, ‘फ्री टू एअर’ वाहिन्यांवर दाखवले जाणारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटही देशात परत येईल.’
मोठ्या प्रसारण समूहांची झाली चर्चा
‘द गार्डियन’ च्या अहवालानुसार, ‘गेल्या काही आठवड्यांत भारतातील स्टार स्पोर्ट्स, इंग्लंडमधील बीटी स्पोर्ट्स आणि स्काय स्पोर्ट्स यासारख्या जागतिक प्रसारणकर्त्यांमध्ये बरीच चर्चा झाली आहे. द टेलीग्राफच्या म्हणण्यानुसार, ‘असे मानले जाते की स्टार समूहाला प्रसारण हक्कांसाठी २० दशलक्षहून अधिक स्टर्लिंग पाउंड मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, आता ही शक्यता मावळली आहे. त्यांना कमी रकमेत हा करार करावा लागेल. ऍशेस मालिकेच्या प्रसारण हक्कांबद्दल बीटी आणि स्काय यांच्यात चढाओढ सुरू आहे.’
स्टारकडे सध्या भारतात क्रिकेट सामने प्रसारित करण्याचे अधिकार आहेत. गार्डियनने आपल्या अहवालात पुढे लिहिले आहे की, लॉकडाऊन दरम्यान चॅनेल फोर टीव्ही पाहणाऱ्यांची संख्या वाढेल अशी आशा व्यक्त करत आहे. या सर्व आघाडीच्या क्रीडा प्रसारण वाहिन्यांसोबतच सोनी ऑस्ट्रेलियातील क्रिकेट सामन्यांचे प्रसारण करते. प्रत्येक क्रिकेट बोर्ड आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या प्रसारणाद्वारे अधिकाधिक आर्थिक नफा मिळवून घेण्याचा प्रयत्नात असते.
महत्वाच्या बातम्या:
पहिल्या कसोटीतील विजयाने हुरळून जाऊ नका, पाकिस्तानच्या प्रशिक्षकांनी खेळाडूंना केले सावध
माजी यष्टीरक्षकाने दिल्या भारतीय संघाला कानपिचक्या, म्हणाला
रवी शास्त्री यांनी भारतीय संघात, रमीज राजा यांचे मोठे वक्तव्य