---Advertisement---

कोहलीसाठी स्टेडियममध्ये फॅन्सची गर्दी, विराटसाठी काय म्हणाले चाहते?

On: मंगळवार, मार्च 4, 2025 6:00 PM
---Advertisement---

आज चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्य फेरीचा पहिला सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघामध्ये दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याला दुपारी अडीच वाजता सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारत ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. भारतीय चाहते मोठ्या संख्येने दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी उपस्थित झाले आहेत.

सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. भारतीय चाहत्यांना अपेक्षा आहे की, आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहली चांगली कामगिरी करेल. या आधी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराटने शतकी खेळी केली होती.

भारतीय चाहते सामन्यापूर्वीच दुबईच्या स्टेडियमवर पोहोचले होते. टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी चाहत्यांनी स्टेडियमवर गर्दी केली आहे. तसेच क्रिकेटचे चाहते भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यावर त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाने सलग चांगलं प्रदर्शन केल आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने बांगलादेशला हरवून स्पर्धेची सुरुवात केली होती. त्यानंतर भारताने पाकिस्तानला हरवले. तसेच शेवटच्या साखळी सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला.

आज चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला उपांत्य फेरीतील सामना खेळला जात आहे. आजच्या सामन्यातील विजेता संघ अंतिम सामन्यांमध्ये पोहोचेल. तसेच 5 मार्च रोजी उपांत्य फेरीतील दुसरा सामना न्यूझीलंड विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होणार आहे. रविवारी स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. तसेच आज भारतीय संघाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा असणार आहेत.

हेही वाचा 

टॅव्हिस हेडच्या विकेटवर अनुष्का शर्माची प्रतिक्रिया व्हायरल, पाहा VIDEO!

किंग कोहलीचा हटके अंदाज, ट्रेविस हेड बाद होताच केला मैदानावर भंगडा डान्स

IND vs AUS: विराटने रचला इतिहास! राहुल द्रविडचा विक्रम मोडून पहिल्या स्थानी झेप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---