आयपीएल 2023 मध्ये सहावा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स असा खेळला गेला. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर खेळला गेलेल्या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 217 धावा केल्या. सर्वच फलंदाजांनी दिलेल्या योगदानानंतर चेन्नईने ही मोठी धावसंख्या पार केली. यासोबतच त्यांच्या नावे आयपीएलमधील एक मोठा विक्रमही जमा झाला.
चेन्नई सुपर किंग्स संघ तब्बल चार वर्षानंतर आपल्या घरच्या मैदानावर खेळत होता. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे या सलामी जोडीने चेन्नई संघाला शतकी भागीदारी करून दिली. ऋतुराजने सलग दुसरे अर्धशतक पूर्ण करताना 31 चेंडूवर 57 धावांची तुफानी खेळी केली. तर कॉनवेने 47 धावा काढल्या. शिवम दुबे व मोईन अली यांनी अनुक्रमे 27 आणि 19 धावांचे योगदान दिले. अखेरीस रायडूने नाबाद 27 व धोनीने 2 षटकारांच्या मदतीने 12 धावा करत संघाला 7 बाद 217 पर्यंत मजल मारून दिली.
चेन्नईने आयपीएलमध्ये 24 व्या वेळी 200 धावांचा पल्ला गाठला. त्यांच्यानंतर या यादीमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा क्रमांक लागतो. त्यांनी 22 वेळा आयपीएलमध्ये 200 धावा केल्या आहेत. त्यानंतर पंजाब किंग्सने 17 व मुंबई इंडियन्सने 16 वेळा हा पराक्रम केला आहे.
चेन्नई सुपर किंग्स आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. चेन्नईने चार वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले असून, सर्वाधिक वेळा प्ले ऑफ फेरी देखील गाठली आहे. चेन्नईने 2010, 2011, 2018 व 2021 मध्ये स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते. तर 2008, 2012, 2013, 2015 व 2019 अशी पाच वेळा अंतिम फेरी देखील खेळली आहे.
(Chennai Super Kings 24th Time Cross 200 Plus Runs In IPL History)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये पुसली जातेय रोहितची ‘हिटमॅन’ ओळख! दोन वर्षापासून ठरलाय ‘सुपरफ्लॉप’
विजयानंतरही आरसीबीचे वाढले टेन्शन! टोप्लीच्या दुखापतीने गोलंदाजी आक्रमण लंगडे? दुखापतग्रस्तांची वाढली यादी