आयपीएलचा १३ वा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आयपीएल २०२० च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे दोन संघ एकमेकांशी भिडतील. २०१९ च्या आयपीएल अंतिम सामान्यामध्येही दोन्ही संघ आपापसात भिडले होते. त्या रोमांचक झालेल्या सामन्यात मुंबईने १ धावेने अंतिम सामना जिंकला. अशा परिस्थितीत या वेळी सीएसके त्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरेल. दोन्ही संघ सध्या सराव करण्यात व्यस्त आहेत.
आयपीएल २०२० चे विजेतेपद जिंकण्यास सीएसके संघ तयारीत आहे. ३ वेळा आयपीएल विजेता झालेला चेन्नई सुपर किंग्स संघ आता चौथ्यांदा आपलं नाव आयपीएल चषकावर करण्यास तयार असेल. तरीही चेन्नईला आयपीएल मोसमाआधी काही धक्के बसले त्यांच्या संघातील सुरेश रैना आणि हरभजन सिंग या महत्त्वाच्या खेळाडूंची माघार घेतली. पण तरीही चेन्नई संघात बरेचसे पर्यायी खेळाडू असल्याने त्यांना त्यांच्या संघातील समतोल राखणे शक्य आहे. या लेखात आपण चेन्नई संघातील ३ अशा खेळाडूंबद्दल जाणून घेऊ जे खेळाडू संघाला विजेतेपद मिळवून देऊ शकतात.
इम्रान ताहिर (Imran Tahir)
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फिरकी गोलंदाज इम्रान ताहिर हा चेन्नईचा ज्येष्ठ फिरकीपटू आहे. मागील हंगामात एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघासाठी त्याने जबरदस्त कामगिरी केली होती. ताहिरने आयपीएल २०१९ मध्ये १७ सामन्यात २६ बळी घेत पर्पल कॅप मिळवली होती. त्याने आतापर्यंत ५५ आयपीएल सामन्यात ७९ बळी मिळवले आहेत.
युएईमधील खेळपट्टी फिरकीपटूंना उपयुक्त असल्याने ताहिर याचा चांगला फायदा उठवू शकतो आणि संघासाठी महत्वाची भूमिका बजावू शकतो. २०१९ प्रमाणे यंदाही तो सर्वात जास्त बळी घेऊन पर्पल कॅप मिळवून संघाला चौथ्यांदा आयपीएल विजेता बनवू शकतो.
रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja)
आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून स्टार अष्टपैलू रविंद्र जडेजा आयपीएलमध्ये सातत्याने खेळत आहे. मागील काही हंगामातून त्याने सीएसके कडून चांगली कामगिरी केली आहे. यंदा ही तो संघासाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावून संघाला विजयी होण्यास महत्वाची भूमिका बजावू शकतो.
त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत १७० सामने खेळले असून त्यात फलंदाजीत त्याने १९२७ धावा केल्या आणि गोलंदाजीत त्याने १०८ बळी मिळवले आहेत. तो चेन्नई संघातील महत्वाचा खेळाडू आहे. एवढेच नाही तर त्याचे क्षेत्ररक्षणही चेन्नई संघाला महत्त्वाचे ठरणार आहे.
फिरकीपटूंना उपयुक्त असलेल्या यूएईतील मैदान तो आपल्या फिरकी गोलंदाजीने गाजवू शकतो आणि संघाला चौथ्यांदा आयपीएल विजेता बनवू शकतो.
एमएस धोनी (MS Dhoni)
‘कॅप्टन कुल’ एमएस धोनी हा चेन्नई सुपर किंग्स संघाला ३ वेळा विजेतेपद मिळवून देणारा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. आयपीएलमध्ये त्याने २०६ षटकार ठोकले असून २०० हुन अधिक षटकार ठोकणारा तो एकमेव भारतीय फलंदाज ठरला आहे.
एमएस धोनीची आयपीएलमधील कामगिरी उत्कृष्ट आहे. एमएस धोनीने आतापर्यंत १९० आयपीएल सामने खेळले आहेत. यावेळी धोनीने ४२.२० अशा उत्तम सरासरीच्या मदतीने ४४३२ धावा केल्या आहेत. धोनी आयपीएलध्ये २३ अर्धशतकेही झळकावली आहेत, तर त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ८४ अशी आहे.
त्याच्या कामगिरीबरोबरच त्याचे उत्तम नेतृत्व संघाच्या यशात महत्त्वाचे ठरले आहे. आजपर्यंत त्याच्याच नेतृत्वाखाली चेन्नईने खेळलेल्या सर्व हंगामात प्ले ऑफ मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे यंदाही त्याच्या नेतृत्वाबरोबरच त्याची कामगिरी संघासाठी महत्त्वाची ठरु शकते.
चेन्नई सुपर किंग्स संघाचे सामने
आयपीएल २०२० मधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचे सामने पुढील प्रमाणे-
१९ सप्टेंबर २०२०
विरुद्ध मुंबई इंडियन्स
२२ सप्टेंबर २०२०
विरुद्ध राजस्थान रॉयल्स
२५ सप्टेंबर २०२०
विरुद्ध दिल्ली कॅपिटलस
०२ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद
०४ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब
०७ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
१० ऑक्टोबर २०२०
विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
१३ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध सनराइझर्स हैदराबाद
१७ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध दिल्ली राजधानी
१९ October ऑक्टोबर २०२०
विरुद्ध राजस्थान रॉयल्स
२३ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध मुंबई इंडियन्स
२४ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
२९ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
०१ नोव्हेंबर २०२०
विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब
चेन्नई सुप किंग्सचा संपूर्ण संघ-
एमएस धोनी (कर्णधार), अंबाती रायुडू, केएम असिफ, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु प्लेसिस, इम्रान ताहिर, एन जगदीसन, कर्ण शर्मा, केदार जाधव, लुंगी एन्गीडी, मिशेल सँटनर, मोनू कुमार, मुरली विजय, रवींद्र जडेजा, ऋतूराज गायकवाड, शेन वॉटसन, शार्दुल ठाकूर, सॅम करन, पीयूष चावला, जोश हेजलवुड, आर साई किशोर