---Advertisement---

‘थाला’चा मोठा डावपेच, आयपीएल २०२१ पुर्वी ‘नव्या मलिंगा’ला संधी; गोलंदाजी पाहून चक्रावून जाल

---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग अर्थात आयपीएल २०२१ चा हंगाम अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपला आहे. ९ एप्रिलपासून या हंगामाची सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी एमएस धोनी याच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाने चौदाव्या हंगामाच्या तयारीला सुरुवात केली आहे. यानंतर नुकतेच अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या सीएसकेने त्यांच्या ताफ्यात २ नवख्या खेळाडूंना सहभागी केले आहे.

गतवर्षीच्या निराशाजनक कामगिरीनंतर सीएसकेला तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. परंतु यंदा दमदार पुनरागमन करत चौथ्यांदा आयपीएल चषक पटकावण्याच्या इराद्याने सीएसके संघ तयारीला लागला आहे. श्रीलंका क्रिकेट संघाचे अनकॅप खेळाडू महेश थिक्शाना आणि मथिशा पथिराना यांना संघात सहभागी करत सीएसके अजून मजबूत संघ बनला आहे. या दोन्ही युवा खेळाडूंचा राखीव खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.

थिक्शाना हा २० वर्षांचा असून तो फिरकी गोलंदाज आहे. तर पथिराना हा १८ वर्षीय वेगवान गोलंदाज आहे. हे दोन्ही खेळाडू सीएसकेच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये दाखल झाले आहेत. त्यातही पथिरानाने त्याच्या भेदक गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

पथिराना नेहमीच त्याच्या आगळ्यावेगळ्या गोलंदाजी शैलीमुळे चर्चेचा विषय बनत असतो. त्याची गोलंदाजी अगदी माजी श्रीलंकन गोलंदाज लसिथ मलिंगाशी मिळतीजुळती असून त्याला ‘नवा मलिंगा’ असेही संबोधले जाते.

मथिशाने टाकला होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू

मथिशा सर्वप्रथम १९ वर्षांखालील विश्वचषकात खेळत असताना चर्चेत आला होता. यावेळी त्याने युवा भारतीय फलंदाज यशस्वी जयस्वालला तब्बल १७२ किलोमीटर दर ताशी वेगाने चेंडू टाकला होता. यासह त्याने पाकिस्तानी दिग्गज शोएब अख्तरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विश्वविक्रम मोडीत मोडीत काढला होता. परंतु एरर ऑफ जजमेंटमुळे हा विक्रम नाकारण्यात आला होता.

महत्त्वाचे म्हणजे, हा आयपीएलचा पहिलाच असा हंगाम आहे, ज्यामध्ये कोणत्याही संघाने श्रीलंका क्रिकेट संघाच्या खेळाडूंना जागा मिळालेली नाही. जर सीएसकेतील कोणता गोलंदाज हंगामादरम्यान दुखापतग्रस्त झाला आणि त्याने माघार घेतली. तर थिक्शाना आणि पथिराना यांपैकी एका खेळाडूला संधी मिळण्याची अपेक्षा आहे.

चेन्नई सुपर किंग्स – २५ खेळाडू (८ परदेशी)

एमएस धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर, नारायण जगदीसन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सँटनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, जोश हेझलवुड, आर साई किशोर, सॅम करन, रॉबिन उथप्पा, कृष्णप्पा गौतम, मोईन अली, चेतेश्वर पुजारा, के भागवथ वर्मा, सी हरी निशांथ, एम हरिशंकर रेड्डी

महत्त्वाच्या बातम्या-

ऐतिहासिक द्विशतक! अफगाणिस्तानच्या ‘या’ क्रिकेटरने सुवर्णाक्षरांनी इतिहासात नोंदवले नाव

जेसन होल्डरची नेतृत्त्वपदावरुन कायमची सुट्टी, ‘हा’ खेळाडू विंडीज कसोटी संघाचा नवा कर्णधार

टी२० मालिका: केवळ विराट, रोहितच नाही तर भारत आणि इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूंनाही मोठे विक्रम करण्याची संधी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---