आगामी आयपीएल हंगामाची चाहत्यांना नक्कीच आतुरता लागली असेल. पण तत्पूर्वी आयपीएलच्या 18व्या हंगामासाठी मेगा लिलाव (24 आणि 25 नोव्हेंबर) रोजी जेद्दा, सौदी अरेबिया येथे होणार आहे. मेगा लिलावापूर्वी सर्व फ्रँचायझींनी एकूण 46 खेळाडूंना कायम ठेवले आहे. मुंबई इंडियन्सने (MI) 5 खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जनेही (CSK) 5 खेळाडूंना कायम ठेवले आहे.
सीएसके 55 कोटी रुपयांच्या पर्ससह लिलावाच्या मैदानात उतरणार आहे. अशा स्थितीत ते अनेक खेळाडूंवर बोली लावू शकतात. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण मुंबई इंडियन्सने (MI) सोडलेल्या त्या 3 खेळाडूंबद्दल जाणून घेऊया. ज्यांना सीएसके (CSK) मेगा लिलावात टार्गेट करू शकते.
जेराल्ड कोएत्झी- यंदाच्या मेगा लिलावात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएत्झीलाही मोठी मागणी असण्याची शक्यता आहे. चमकदार गोलंदाजी करण्याबरोबरच तो गरज पडेल तेव्हा फलंदाजीही करू शकतो. तो एसए-20 लीगमध्ये सीएसके फ्रँचायझीसाठी खेळला आहे. त्यामुळे सीएसके व्यवस्थापनाला त्याच्या क्षमतेची चांगलीच जाणीव असेल.
ईशान किशन- ईशान किशन (Ishan Kishan) हा मुंबई इंडियन्सचा (MI) प्रमुख खेळाडू होता. पण मुंबईने त्याला रिलीज केले आहे. आता मेगा लिलावात अनेक मोठे संघ किशनवर बोली लावताना दिसणार आहेत. ईशानला विकत घेऊन सीएसके त्याचा सलामीवीर म्हणून खेळवू शकेल.
टिम डेव्हिड- ऑस्ट्रेलियन फलंदाज टिम डेव्हिड (Tim David) देखील मेगा लिलावात दिसणार आहे. जो फिनिशरची भूमिका बजावण्यासाठी योग्य खेळाडू आहे. सीएसके संघ त्याला टार्गेट करू शकतो. डेव्हिडने आतापर्यंत आयपीएलचे 4 हंगाम खेळले असून गेल्या 3 हंगामातील त्याची कामगिरीही चांगली राहिली आहे. दरम्यान त्याने 170+ स्ट्राईक रेटने 38 सामन्यांत 695 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“बंद करा भारतासोबत खेळणं…” माजी पाकिस्तानी दिग्गजाचे वादग्रस्त विधान
“तुमचं पाकिस्तानात स्वागत आहे”, मोहम्मद रिझवाननं दिलं भारतीय खेळाडूंना चॅम्पियन्स ट्रॉफीचं निमंत्रण
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका डावात सर्वोच्च धावसंख्या (टाॅप-5) संघ