---Advertisement---

वचन पाळले! चेन्नई सुपर किंग्सकडून ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राचा सन्मान, एक कोटी रुपयांसह दिली खास जर्सी

---Advertisement---

आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रेंचायझींमधील एक चेन्नई सुपर किंग्जने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचा सन्मान केला आहे. चेन्नई सुपर किंग्स लिमिटेडने भालाफेक स्पर्धेत भारताला पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राला रविवारी (३१ ऑक्टोबर) एक कोटी रुपये देऊन सन्मानित केले आहे. तसेच त्याला चेन्नई सुपर किंग्ज संघाची एक खास जर्सीही देण्यात आली आहे.

चेन्नई सुपर किंग्जने रविवारी नीरजला एक कोटी रुपयांसह संघाची एक खास जर्सीही भेट दिली आहे. नीरजने ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत ८७.५८ मीटर भाला फेकला होता आणि सुवर्ण पदक जिंकले होते. याच कारणास्तव त्याला चेन्नईने ८७५८ नंबरची खास जर्सी भेट दिली आहे. नीरज भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रानंतर दुसरा खेळाडू ठरला आहे, ज्याने ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले आहे.

निरजचा सन्मान केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज फ्रेंचायझीचे सीईओ एस विश्वनाथन यांनी त्याचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की,”नीरजच्या या उत्कृष्ट कामिगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. ट्रॅक आणि फील्डमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय बनून त्याने बेंचमार्क बनवला आहे आणि पुढच्या पिढीसाठी प्रेरणा बनला आहे. ८७.५८ एक असा क्रमांक आहे, जो भारतीय खेळाच्या इतिहासात कायमचा लक्षात ठेवला जाईल आणि नीरजला ही विशेष जर्सी भेट देणे आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आमची इच्छा आहे की, त्याने देशासाठी अजून गौरव घेऊन यावा.”

नीरजचा सन्मान करण्यात आल्यानंतर तो म्हणाला की, “तुमच्या समर्थनासाठी आणि पुरस्कारासाठी खूप खूप धन्यवाद. हे चांगले वाटत आहे. मागचे दोन महिने व्यस्त आणि नवीन गोष्टींचा अनुभव घेण्याची संधी देत राहिले आहेत. मी कधीच विचार केला नव्हता की, सुवर्ण जिंकल्यानंतर मला एवढे प्रेम मिळेल. हे पूर्णपणे अनपेक्षित होते आणि चांगले वाटते. आशा आहे की, मी चांगली मेहनत करेल आणि चांगली कामगिरी करेल.”

महत्त्वाच्या बातम्या – 

स्मिथवर शेन वार्नने साधला निशाणा, पण नेटकऱ्यांनी दिग्गजालाच टाकली गुगली

ट्विटरवर सुरू झाला बॅन आयपीएल ट्रेंड; चाहत्यांच्या आल्या संतप्त प्रतिक्रिया

न्यूझीलंडने दुसऱ्यांदा केली टीम इंडियाची नाचक्की; टी२० विश्वचषकातील…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---