बुधवारी (दि. 10 मे) आयपीएल 2023चा 55वा सामना चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी उभय संघात 7 वाजता नाणेफेक झाली. ही नाणेफेक जिंकत चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने फलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना जिंकून चेन्नई संघ गुणतालिकेतील जागा मजबूत करण्याचा प्रयत्न करेल.
एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघ एक बदलासह दिल्लीविरुद्ध मैदानात उतरणार आहे. मथीशा पथिराना (Matheesha Pathirana) संघातून बाहेर पडला असून त्याच्या जागी अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याची संघात एन्ट्री झाली आहे. विशेष म्हणजे, पथिरानाला सब्स्टिट्यूट खेळाडूंमध्ये ठेवले आहे. तसेच, डेविड वॉर्नर (David Warner) याच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्स संघही एक बदलासह मैदानात उतरणार आहे. दिल्ली संघातून मनीष पांडे बाहेर पडला असून ललित यादव याची संघात एन्ट्री झाली आहे.
https://twitter.com/IPL/status/1656292953739132928
हंगामातील कामगिरी
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने दिल्लीविरुद्ध भिडण्यापूर्वी आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत एकूण 11 सामने खेळले आहेत. त्यातील 6 सामन्यात सीएसकेने विजय मिळवला आहे, तर 4 सामन्यात पराभव पत्करला आहे. तसेच, 1 सामना अनिर्णित राहिला होता. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने 10 सामने खेळले असून त्यातील 4 सामन्यात विजय, तर 6 सामन्यात पराभव पत्करला आहे. गुणतालिकेतील स्थानाविषयी बोलायचं झालं, तर सीएसके संघ 13 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तसेच, दिल्ली संघ 8 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे. (Chennai Super Kings have won the toss and have opted to bat against dc ipl 2023)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
चेन्नई सुपर किंग्स
ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), दीपक चाहर, मथीशा पथीराना, तुषार देशपांडे, महीश थीक्षणा
चेन्नईचे सब्स्टिट्यूट खेळाडू- मथीशा पथिराना, शुभ्रांशू सेनापती, मिचेल सँटनर, आकाश सिंग, शेख राशिद
दिल्ली कॅपिटल्स
डेविड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), मिचेल मार्श, रायली रुसो, अक्षर पटेल, अमन हकीम खान, ललित यादव, कुलदीप यादव, मुकेश कुमार, खलील अहमद, ईशांत शर्मा
दिल्लीचे सब्स्टिट्यूट खेळाडू- मुकेश कुमार, मनीष पांडे, प्रवीण दुबे, अभिषेक पोरेल, चेतन सकारिया
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बॅटिंग करताना त्याला रोखणे खूपच कठीण…’, विस्फोटक सूर्याची फलंदाजी पाहून भारतीय दिग्गजाने गायले गोडवे
मोठी बातमी! ODI World Cup 2023च्या तारखा आल्या समोर, ‘या’ दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान, जाणून घ्याच






