चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी शिवम दुबेची तुलना चक्क महान भारतीय कर्णधार कपिल देव यांच्याशी केली. स्टीफन फ्लेमिंग यांच्या म्हणण्यानुसार, शिवम दुबे ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतो, ते कपिल देवसारखं आहे.
शिवम दुबेबद्दल बोलायचं झालं तर, तो फलंदाजीशिवाय गोलंदाजीही करू करतो. मात्र, आयपीएलमधील ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमामुळे त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. याचा परिणाम त्याच्या गोलंदाजीवर दिसून आला आहे. जरी टी20 विश्वचषकासाठी त्याचा अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय संघात समावेश करण्यात आला असला, तरी त्याची गोलंदाजी कशी आहे हे पाहणं बाकी आहे. त्यानं अद्याप मोठ्या सामन्यांमध्ये गोलंदाजी केलेली नाही.
शिवम दुबेनं आयपीएलदरम्यान त्याच्या गोलंदाजीवर खूप मेहनत घेतल्याचं फ्लेमिंग म्हणाले. “शिवम दुबे ज्या पद्धतीने बोलतो, त्याची गोलंदाजी तशीच राहिली तर तो कपिल देवसारखाच आहे. तो खूप मेहनत घेत आहे. आयपीएलदरम्यान त्यानं खूप मेहनत घेतली. आमच्याकडे अष्टपैलू भूमिका निभावणारे अनेक खेळाडू होते, परंतु ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंचं महत्त्व कमी आहे. ही चांगली गोष्ट नाही. शिवम दुबेनं आपल्या गोलंदाजीवर खूप मेहनत घेतली असून परिस्थिती योग्य असेल तर तो फलंदाजांना अडचणीत आणू शकतो. त्याचे कटर बॉल आणि वेगातील बदल हुकुमी ठरू शकतात”, असं फ्लेमिंग म्हणाले.
टी20 विश्वचषकात टीम इंडियाला आपला पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळायचा आहे. 6 जून रोजी न्यूयॉर्कच्या नासाऊ क्रिकेट स्टेडियवर हा सामना खेळला जाईल. या सामन्यात शिवम दुबे खेळण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ओमानच्या कर्णधाराची गर्जना! ऑस्ट्रेलियाला दिलं खुलं आव्हान; विश्वचषकात येणार आमनेसामने
शिवम दुबे ठरणार गेमचेंजर? प्लेइंग इलेव्हनमध्ये आणण्यासाठी टीम इंडिया घेऊ शकते मोठा निर्णय!
युरोपियन देशांविरुद्ध एकही टी20 सामना जिंकू शकले नाही! साहेबांच्या नावे लज्जास्पद विक्रम कायम