आयपीएल २०२२चा सतरावा सामना मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात बॅकफूटवर असलेला चेन्नईचा संघ फलंदाजीबरोबरच गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही संघर्ष करताना दिसला. परिणामी त्यांनी ८ विकेट्स राखून हा सामना खिशात घातला आहे. हा हैदराबादचा हंगामातील पहिलाच विजय आहे. तर चेन्नईने आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच सुरुवातीचे ४ सामने गमावले आहेत.
या सामन्यात (CSK vs SRH) नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने निर्धारित २० षटकांमध्ये ७ विकेट्च्या नुकसानावर १५४ धावा केल्या. हैदराबादने १७.४ षटकांमध्ये २ विकेट्सच्या नुकसानावर सहज चेन्नईचे (SRH Beat CSK) लक्ष्य गाठले.
अभिषेक शर्माची मॅच विनिंग खेळी
चेन्नईच्या १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादकडून सलामीवीर आणि युवा फलंदाज अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याने कौतुकास्पद खेळी केली. त्याने ५० चेंडूंमध्ये १५० च्या स्ट्राईक रेटने ७५ धावा फटकावल्या. या खेळीदरम्यान त्याने ३ षटकार आणि ५ चौकारही मारले. याखेरीज कर्णधार केन विलियम्सनसोबत मिळून त्याने पहिल्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारीही रचली. तसेच विलियम्सननेही ३२ धावा जोडल्या. तसेच राहुल त्रिपाठीने शेवटी १५ चेंडूत नाबाद ३९ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
या डावात चेन्नईकडून गोलंदाजांनी निराशा केली. त्यांना पूर्ण डावादरम्यान केवळ दोनच विकेट्स घेता आल्या. मुकेश चौधरी आणि ड्वेन ब्रावो यांना फक्त १-१ विकेट घेतला आल्या.
चेन्नईच्या फलंदाजांकडून निराशा
तत्पूर्वी चेन्नईकडून मोईन अलीने सर्वाधिक ४८ धावा केल्या. ३५ चेंडू खेळताना २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने त्याने या धावा फटकावल्या. त्याच्याव्यतिरिक्त अंबाती रायुडूने २७ तर कर्णधार रविंद्र जडेजाने २३ धावांचे योगदान दिले. युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. तो १५ धावा करून बाद झाला. इतर फलंदाजांनाही विशेष खेळी करता आल्या नाहीत. त्यामुळे चेन्नईचा संघ केवळ १५४ धावांवर मजल मारू शकला.
या डावात हैदराबादच्या गोलंदाजांनी ७ विकेट्स काढल्या. वॉशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार, मार्को जेन्सन आणि ऍडम मार्करम यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
Maharashtra Kesari | पृथ्वीराज पाटील नवा ‘महाराष्ट्र केसरी’, जिंकली मानाची गदा! विशाल बनकर पराभूत
‘भुवनेश्वर आता विकेट घेणारा गोलंदाज नाही राहिला’, अनुभवी गोलंदाजांवर माजी क्रिकेटरकडून टीका
RCB vs MI: बेंगलोरचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय; दोन्ही संघात धडाकेबाज खेळाडूंची एन्ट्री