भारतात सध्या इंडियन क्रिकेटची धामधूम सुरु असून रोजच रोमांचक सामने पाहायला मिळत आहे. पण, अजूनही कोरोनाचे सावट पूर्णपणे दूर झालेले नसल्याने खेळाडू बायोबबलमध्येच आहे. यादरम्यान खेळाडू वेगवेगळे सण देखील साजरे करताना दिसत आहेत. चेन्नई सुपर किंग्स संघाने देखील पुतुवरुतम हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला.
पुतुवरुतम हा सण तमिळ नवीन वर्ष (Tamil New Years) म्हणून साजरा केला जातो. याच सणाच्या निमित्ताने चेन्नई (Chennai Super Kings) संघातील खेळाडूंनी पारंपारीक वेष परिधान करत आनंद साजरा केला. याचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Kings with Kolamaavu! 👑v🔯
Super Local Challenge with the Chennai boys! 😎
📹 👉 https://t.co/nm29sxqneX#விசில்போடு #Yellove 🦁💛 pic.twitter.com/wQgOP5GDQF— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 14, 2022
या व्हिडिओमध्ये दिसते की, चेन्नईचा यष्टीरक्षक फलंदाज एन जगदिशन खेळाडूंना सणाबद्दल समजावत आहे. तसेच सी हरी निशांत पांरपारीक पद्धतीने लुंगी कशी नेसायची हे देखील सांगितले आहे. त्याचबरोबर खेळाडूंनी रांगोळ्या देखील काढल्या आहेत. व्हिडिओच्या शेवटी चेन्नईच्या खेळाडूंनी तमिळ नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. यात न्यूझीलंडचा क्रिकेटपटू डेवॉन कॉनवेही दिसला. (Chennai Super Kings Players celebrate Tamil New Year)
Super Kudumbam 🦁 ➡️ Super fans 💛!
வளங்களும், நலன்களும் நிறைய உளங்கனிந்த புத்தாண்டு நல்வாழ்த்துக்கள்! 😍#விசில்போடு #Yellove 🦁💛 pic.twitter.com/wZacbhscQG— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 14, 2022
चेन्नई खेळतेय नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली
चेन्नई सुपर किंग्स संघ सध्या रविंद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. आयपीएलच्या १५ व्या हंगामापूर्वी एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व सोडले. त्यामुळे ही जबाबदारी संघातील अनुभवी अष्टपैलू खेळाडू जडेजाकडे देण्यात आली. मात्र, जडेजासाठी नेतृत्वाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. कारण चेन्नईने पहिल्या चारही सामन्यात पराभवाचा सामना केला. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असे झाले की, चेन्नई आयपीएलमधील हंगामातील पहिले ४ सामने पराभूत झाले.
पण चेन्नईने पाचव्या सामन्यात दमदार पुनरागमन करत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पराभवाचा धक्का दिला आणि आयपीएलच्या १५ व्या हंगामात विजयाचे खाते उघडले. सध्या गुणतालिकेत चेन्नई ९ व्या क्रमांकावर आहे. त्यांचा पुढील सामना १७ एप्रिलला गुजरात टायटन्स विरुद्ध होणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
सामन्यानंतर कर्णधार मयंक अगरवालला फलंदाजी टिप्स देताना दिसला सचिन तेंडुलकर, व्हिडिओ व्हायरल
ब्रेकिंग! दीपक चाहर आयपीएलसह टी२० वर्ल्डकपलाही मुकण्याची शक्यता, तब्येतीबाबत महत्वाची अपडेट