आयपीएल 2024 साठी खेळाडू कायम करण्याची अंतिम तारीख 26 नोव्हेंबर होती. या अखेरच्या दिवशी पाच वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्सने आपल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. सीएसके संघ व्यवस्थापनाने आपल्या 26 पैकी आठ खेळाडूंना करारमुक्त केले. विशेष म्हणजे संघाचा कर्णधार एमएस धोनी हा आणखी एक हंगाम खेळणार असल्याचे नक्की झाले आहे. आयपीएल लिलावात त्यांच्याकडे 32.10 कोटी रुपये शिल्लक असतील.
CSK PURSE BALANCE : 32.10 Crores pic.twitter.com/KWxw0E4ju5
— Junaid Khan (@JunaidKhanation) November 26, 2023
सीएसकेने करारमुक्त केलेले खेळाडू:
बेन स्टोक्स (अनुपलब्ध), ड्वेन प्रिटोरियस, भगत वर्मा, सुभ्रांशु सेनापती, अंबाती रायुडू (निवृत्ती), कायले जेमिसन, आकाश सिंग, सिसांडा मगाला.
सीएसकेने कायम केलेले खेळाडू:
एमएस धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, मोईन अली, डेवॉन कॉनवे, महिश थिक्षणा, दीपक चहर, रवींद्र जडेजा, मथिशा पथिराना, अजिंक्य रहाणे, मुकेश चौधरी, शिवम दुबे, प्रशांत सोलंकी, मिचेल सॅंटनर, निशांत सिंधू, राजवर्धन हंगरगेकर, अजय मंडल, शेख राशिद व सिमरजीत सिंग.
(Chennai Super Kings Released 8 Players Ahead IPL 2024)
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याला 15 वर्षे पूर्ण, भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने केली भावनिक पोस्ट
ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘भारतीय फलंदाजांपेक्षा…’