---Advertisement---

नव्या हंगामात ‘थाला’ची सेना उतरणार नव्या अंदाजात, पाहा सीएसकेची नवीकोरी जर्सी

On: मंगळवार, मार्च 9, 2021 9:01 AM
dhoni csk
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. चेन्नई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात या हंगामाचा सलामीचा सामना रंगणार आहे. हे सामने चेन्नईसह मुंबई, अहमदाबाद, बंगळूरु, दिल्ली आणि कोलकाता येथे खेळवण्यात येणार आहे.

या स्पर्धेत ३ वेळेस जेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाला गेल्या सत्रात साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे येणाऱ्या हंगामात चेन्नई संघ नवीन उत्साहासह मैदानात उतरणार आहे. तसेच चाहत्यांना चेन्नई संघ एका नवीन जर्सी मध्ये पाहायला मिळणार आहे.

युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाने विशेष कामगिरी केली नाही. त्यामुळे आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नई संघ प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्यापासून वंचित राहिला होता. याचा परिणाम असा झाला की, कार बनवणारी प्रसिद्ध कंपनी ‘स्कोडा’ ने चेन्नई संघासोबत असलेला प्रायोजकत्वाचा करार संपवला. त्यामुळे यंदा चेन्नई संघ प्रसिद्ध फॅशन कंपनी ‘मिंत्रा’च्या रंगात रंगलेला दिसणार आहे. त्यामुळेच चाहत्यांना चेन्नई संघाच्या जर्सीमध्ये काही बदल पाहायला मिळतील.

स्कोडा कंपनीने नाव मागे घेतल्यानंतर मिंत्रा कंपनीने संधीचे सोने करत चेन्नई संघाचे प्रायोजकत्व प्राप्त केले आहे. याबाबतची माहिती चेन्नई संघाने आणि मित्रां कंपनीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. मित्रांने चेन्नई संघाच्या जर्सीवर त्यांचा लोगो लावून एक फोटो शेअर केला आहे आणि लिहले आहे की, ‘उशिरा आलो पण नवीनच आहोत.’

त्यांनतर चेन्नई सुपर किंग्सने देखील ‘उत्तम’ असे कमेंट केले. यावर मिंत्राने ‘तुमच्या सोबत काम करण्यास उत्सुक आहोत’ असे लिहले आहे.

आयपीएल २०२१ साठी चेन्नई सुपर किंग्स संघ

एमएस धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर, नारायण जगदीसन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सँटनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, जोश हेझलवुड, आर साई किशोर, सॅम करन, रॉबिन उथप्पा, कृष्णप्पा गौतम, मोईन अली, चेतेश्वर पुजारा, के भागवथ वर्मा, सी हरी निशांथ, एम हरिशंकर रेड्डी

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल २०२१ चं वेळापत्रक झालं घोषित; पंजाब किंग्जची मालकीण म्हणते, ‘हे थोडं विचित्र वाटतंय’

चोप चोप चोपणार!! आगामी टी२० मालिकेत ‘हे’ भारतीय फलंदाज पाडणार धावांचा पाऊस

महान कर्णधार, बीसीसीआय अध्यक्ष आता ‘दादा’ चढणार का राजकारणाची पायरी? म्हणतो, “बघू संधी…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---