बुधवारी (दि. 10 मे) चेन्नईच्या चेपॉक म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडिअमवरील आयपीएल 2023चा 55वा सामना चेन्नई सुपर किंग्स संघासाठी खास ठरला. महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वातील सीएसकेने या सामन्यात दिल्लीला 27 धावांनी पराभवाचा धक्का दिला. या विजयात फलंदाजांसोबतच गोलंदाजांनीही मोलाचे योगदान दिले. हा सामना जिंकताच चेन्नईने गुणतालिकेतील स्थान आणखी बळकट केले, तर दिल्लीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजी करताना सीएसके (CSK) संघाने निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 167 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाला 7 विकेट्स गमावत 148 धावाच करता आल्या. त्यामुळे चेन्नईने हा सामना 27 धावांनी जिंकला.
दिल्लीकडून फलंदाजी करताना रायली रुसो याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने यावेळी 37 चेंडूंचा सामना करताना 35 धावा केल्या. यामध्ये 1 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त मनीष पांडे याने 27 धावांचे योगदान दिले. त्याच्याव्यतिरिक्त अक्षर पटेलने 21 धावा आणि फिलिप सॉल्टने 17 धावा केल्या. तसेच, ललित यादवने नाबाद 12 धावा केल्या आणि रिपल पटेल 10 धावा करून बाद झाला. कर्णधार डेविड वॉर्नर (David Warner) शून्यावर बाद झाला.
यावेळी चेन्नईकडून गोलंदाजी करताना मथीशा पथिराना चमकला. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 37 धावा खर्च करत सर्वाधिक 3 विकेट्स चटकावल्या. दीपक चाहर यानेही 3 षटके टाकताना 22 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त रवींद्र जडेजा याने 1 विकेट नावावर केली.
चेन्नईची सांघिक कामगिरी
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना सीएसकेकडून शिवम दुबे याने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने फक्त 12 चेंडूत 25 धावा केल्या. यामध्ये 3 षटकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त 5 फलंदाजांनी 20 किंवा त्याहून अधिक धावा केल्या. त्यात ऋतुराज गायकवाड (24), अंबाती रायुडू (23), अजिंक्य रहाणे (21), रवींद्र जडेजा (21) आणि एमएस धोनी (20) यांचा समावेश होता. तसेच, डेवॉन कॉनवे हा 10 धावांवर तंबूत परतला. यावेळी एकाही फलंदाजाने मोठी खेळी केली नाही. मात्र, सांघिक कामगिरीमुळे दिल्लीपुढे मोठे आव्हान ठेवण्यात यश आले.
यावेळी दिल्लीकडून गोलंदाजी करताना मिचेल मार्श याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. मार्शने 3 षटके गोलंदाजी करताना 18 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त अक्षर पटेलने 2, तर खलील अहमद, ललित यादव आणि कुलदीप यादव या तीन गोलंदाजांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.
चेन्नईचा पुढील सामना केकेआरविरुद्ध
या विजयासह चेन्नई सुपर किंग्सने गुणतालिकेतील स्थान आणखी बळकट केले. चेन्नईचे 15 गुण झाले असून संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे, पंजाब संघ तळाशी असून त्यांचे 8 गुण आहेत. आता चेन्नईला पुढील सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 14 मे रोजी खेळायचा आहे. (Chennai Super Kings won by 27 runs Delhi Capitals In 55th IPL 2023 Match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video : वडील धोनीने षटकार मारताच झिवाने वाजवली शिट्टी, तर पत्नी साक्षीनेही केला आनंद साजरा
नाद करायचा नाय! चाहर 2018पासून गाजवतोय आयपीएलचा पॉवरप्ले, बोल्ट अन् शमीलाही पछाडत रचला विक्रम