सध्या आयपीएलच्या 18 व्या हंगामाचे वारे वाहत आहे. आत्तापर्यंत आयपीएलचे 7 सामने पार पडले आहेत. आयपीएल 2025 मधील आठवा सामना आज 28 मार्च रोजी खेळला जात आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Csk vs Rcb) हे दोन संघ समोरासमोर उभे ठाकलेले आहेत. चेन्नईचे होम ग्राउंड, चेपॉक येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग संघाने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलाय व आरसीबीला फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे.
दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन :
चेन्नई सुपर किंग: ऋतुराज गायकवाड,रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, सॅम करण, एम एस धोनी ,आर अश्विन, नूर अहमद , मथीशा पथीराना, खलील अहमद
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: रजत पाटीदार,विराट कोहली, फिल्स सॉल्ट, देवदत्त पडिकल, लियाम लिविंगस्टोन,जितेश शर्मा,टीम डेविड कुणाल पांड्या, भुवनेश्वर, कुमार जोश हेजलवूड
चेन्नई सुपर किंग आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal challengers bengaluru) यांच्यात एकूण 33 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये सीएसकेचे (chennai super kings) पारडे जड राहिले आहे. सीएसकेने 21 वेळा आणि आरसीबीने फक्त 11 वेळा विजय मिळवला आहे. चेपॉकमध्ये चेन्नईचा रेकॉर्डही उत्कृष्ट आहे तर आरसीबीचा सीएसके विरुद्ध येथे शेवटचा सामना 2008 मध्ये झाला होता. या दोघांमध्ये चेपॉकमध्ये 9 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 8 सामने सीएसकेने जिंकले आहेत आणि फक्त 1 सामना आरसीबीने जिंकला आहे.