गोवा। रिलायन्स फाउंडेशन डेव्हलपमेंट लीगच्या ( आरएफडीएल) तिसऱ्या राऊंडमध्ये शनिवारी चेन्नईयन एफसी विरुद्ध केरला ब्लास्टर्स असा पहिला सामना रंगणार आहे. केरला ब्लास्टर्सने सलग दोन विजयांसह गुणतालिकेत मजबूत आघाडी घेतली आहे आणि त्यांची घोडदौड रोखण्याचे आव्हान चेन्नईयनला पेलावे लागणार आहे. आजच्या दुसऱ्या लढतीत मुंबई सिटी एफसी व रिलायन्स फाउंडेशन यंग चॅम्प्स ( RFYC) हे भिडणार आहेत आणि दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधात आहेत.
चेन्नईयन एफसीने मागील सामन्यात जमशेदपूर एफसीला कडवी टक्कर दिली होती, परंतु भरपाई वेळेतील गोलमुळे चेन्नईयनला २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. ०-१ अशा पिछाडीवरून चेन्नईयनने २-१ अशी आघाडी घेतली होती, परंतु त्यांना पहिला विजयापासून वंचित रहावे लागले. पण, या सामन्यातील कामगिरीमुळे त्यांचे मनोबल उंचावले आहे आणि केरला ब्लास्टर्सविरुद्ध त्याच आत्मविश्वासाने ते खेळणार आहेत. क्लेओफास अॅलेक्स यांच्या संघासाठी ही लिटमस चाचणी आहे.
सुहैल पाशा व जॉन्सन जोसेफ यांनी मागील सामन्यात दमदार कामगिरी करून दाखवली आणि ते सातत्य राखण्यास प्रयत्नशील आहेत, परंतु बिजॉय व्हॅर्घेस याच्यासारख्या तगड्या खेळाडूसमोर त्यांचा कस लागेल हे निश्चित आहे. हिरो इंडियन सुपर लीगमधील केरला ब्लास्टर्स संघाचा बिजॉय हा सदस्य आहे. केरला ब्लास्टर्सचा कर्णधार आयुष अधिकारी याने मागील सामन्यात गोल केलाच, शिवाय त्याने संजीव स्टॅलिनसह मुंबई सिटीच्या बचावपटूंचा घाम काढला. केरला आणि बंगलोर हे प्रत्येकी सहा गुणांसह संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहे. चेन्नईयन दोन सामन्यानंतर एका गुणासह सहाव्या क्रमांकावर आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दरम्यान, रिलायन्स फाउंडेशन यंग चॅम्स संघाने हैदराबाद एफसीविरुद्ध चांगली कामगिरी करून दाखवली आहे आणि मुख्य प्रशिक्षक आराटा इझूमी यांना खेळाडूंकडून तशी कामगिरी मुंबई सिटीविरुद्धच्या लढतीत पाहायची आहे. यंग चॅम्प्सनी तगड्या हैदराबादला कडवी झुंज दिली. बंगलोर एफसीविरुद्धच्या पहिल्या लढतीतून त्यांनी धडा घेताना हैदराबादविरुद्ध कामगिरीत सुधारणा केली. रझिबूल मिस्त्रीने हैदराबादविरुद्ध गोल केला होता, परंतु सहकाऱ्याच्या स्वयंगोलने हैदराबादला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली आणि त्यानंतर बिष्णू बोरडोलोईने हैदराबादसाठी विजयी गोल केला होता.
मुंबई सिटीची पाटी दोन सामन्यांनंतर कोरीच आहे. केरला ब्लास्टर्सविरुद्ध त्यांनी दुसऱ्या हाफमध्ये सुरेख खेळ करताना गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या होत्या. श्रेयस वाटेकर व नकुल शेळके यांनी प्रभावी कामगिरी केली होती. मुंबई गुणतालिकेत ८व्या क्रमांकावर आहे, तर यंग चॅम्प्स गोल डिफरेन्समुळे एक स्थान वर आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! ख्रिस्तियानो रोनाल्डोवर कोसळला दु:खाचा डोंगर, मुलाचे झाले निधन; वाचा सविस्तर
स्पोर्ट्स रिलायन्स फाउंडेशन डेव्हलपमेंट लीगचा पहिलावहिला हंगाम १५ एप्रिलपासून