भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची म्हणजेच बीसीसीआयची आज (२४ डिसेंबर) ८९ वी वार्षिक सभा अहमदाबाद येथे पार पडली. या सभेमध्ये तीन निवडकर्त्यांची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडकर्ता म्हणून १९८७ साली विश्वचषकात हॅट्रिक घेणारे दिग्गज क्रिकेटपटू चेतन शर्मा यांची निवड केली आहे. शर्मा यांनी २३ कसोटी आणि ६५ वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
चेतन शर्मा यांच्यासह अन्य २ निवडकर्त्यांची निवड बीसीसीआयच्या सल्लागार समितीने केली आहे. सल्लागार समितीमध्ये मदन लाल, आरपी सिंग आणि सुलक्षणा नाईक यांचा समावेश आहे. यांची व्हर्च्यूएल बैठक पार पडली. त्यानी निवड केलेल्या ३ निवडकर्त्यांपमध्ये चेतन शर्मा व्यतिरिक्त देबाशिष मोहंती आणि अबे कुरुविला यांचा समावेश आहे.
Based on CAC’s recommendations Mr Chetan Sharma, Mr Abey Kuruvilla and Mr Debashish Mohanty have been appointed to the senior selection committee. Mr Sharma will be head the selection panel.
Details 👉 https://t.co/05nmQMBAVh pic.twitter.com/XIUDDiRGzY
— BCCI (@BCCI) December 24, 2020
बीसीसीआयच्या नियमानुसार सर्वात जास्त कसोटी सामने खेळणाऱ्या व्यक्तीलाच निवड समितीचे प्रमुख बनवले जाते. यापूर्वी सुनील जोशी हे निवड समितीचे प्रमुख होते. त्यांनी भारताकडून १५ कसोटी सामने खेळले होते.
निवडकर्ता पदासाठी माजी भारतीय खेळाडू अजित आगरकर याच्यासह वेस्ट झोनमधून नयन मोंगिया आणि अभय कुरुविला यांनी देखील आवेदन दिले होते. त्यांच्यासोबतच नॉर्थ झोन मधून चेतन शर्मा, मनिंदर सिंह, विजय दहिया, अजय रात्रा आणि निखिल चोप्रा, तर ईस्ट झोनकडून शिव सुंदर दास, देबाशिष मोहंती आणि राणादेव बोसदेखील या पदाच्या शर्यतीत होते.