भारताचा कसोटीपटू चेतेश्वर पुजारा सध्या इंग्लंडच्या ससेक्स संघाकडून रॉयल लंडन वनडे कपमध्ये धुमाकूळ घालत आहे. त्याने या स्पर्धेत विस्फोटक फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. अशात आता कर्णधार पुजाराच्या संगतीत राहून त्याच्या एका संघ सहकाऱ्यानेही वादळी खेळी केली आहे. या खेळाडूने रॉयल लंडन कपमध्ये चक्क द्विशतक केले आहे. या खेळाडूचे नाव आहे, अली ओर्र.
शुक्रवारी (१९ ऑगस्ट) रॉयल लंडन कपमध्ये (Royal London ODI Cup) ससेक्स विरुद्ध सोमरसेट संघात लढत झाली. या लढतीत ससेक्सच्या खेळाडूंनी फलंदाजी आणि गोलंदाजीत दोन्हीत दमदार खेळ दाखवत २०१ धावांनी हा सामना जिंकला. या सामना विजयात ससेक्सचा कर्णधार पुजारा याच्याबरोबरच अलीचाही मोठा वाटा राहिला.
अलीने (Ali Orr) या सामन्यात सलामीला फलंदाजी करताना द्विशतक झळकावले. १६१ चेंडूंचा सामना करताना ११ षटकार आणि १८ चौकारांच्या मदतीने त्याने २०६ धावा फटकावल्या. १२७.९५ च्या स्ट्राईक रेटने त्याने या धावा काढल्या. या द्विशतकी खेळीसह त्याने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले आहेत. अली वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा ३५ वा खेळाडू बनला आहे. या ३५ पैकी ८ द्विशतके ही आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये केलीे गेली आहेत. तर २७ द्विशतके लिस्ट ए क्रिकेटमध्ये झाली आहेत.
That WINNING Friday feeling. 😍
Brought to you by DOUBLE CENTURION Ali Orr. 💯💯 pic.twitter.com/D3ef07xlPO
— Sussex Cricket (@SussexCCC) August 19, 2022
२१ वर्षांच्या अलीने या द्विशतकासह संघनायक पुजारालाही (Cheteshwar Pujara) मागे सोडले आहे. तो ससेक्सकडून सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारा फलंदाज बनला आहे. यापूर्वी पुजाराच्या नावावर हा विक्रम होता. पुजाराने ५ दिवसांपूर्वीच सर्रेविरुद्ध १७४ धावा केल्या होत्या. परंतु आता अलीने पुजाराचाही विक्रम मोडला आहे.
💯 ❎ 2️⃣
What a moment for Ali Orr 👏👏#RLC22 pic.twitter.com/yEcXnTsUZD
— Metro Bank One Day Cup (@onedaycup) August 19, 2022
दरम्यान या सामन्याच प्रथम फलंदाजी करताना ससेक्स संघाने ५ विकेट्सच्या नुकसानावर ३९७ धावा केल्या. या डावात ससेक्सकडून सलामीवीर अलीव्यक्तिरिक्त कर्णधार पुजारानेही अर्धशतकी योगदान दिले. पुजाराने १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या. तसेच डेलरे रॉलिन्स यानेही खालच्या फळीत झंझावाती अर्धशतक ठोकले. त्याने २३ चेंडूत नाबाद ५४ धावा केल्या.
ससेक्सच्या ३९८ धावांचा बचाव करताना गोलंदाजांनीही चांगला खेळ दाखवला. जेम्स कोल्स (३ विकेट्स), ब्रॅडले करी (३ विकेट्स) आणि हेनरी क्रोकोम्बो (०२ विकेट्स) यांनी दमदार गोलंदाजी केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
छोरी छा गयी! १८ वर्षाची ‘अंतिम’ बनली कुस्तीची नवी वर्ल्ड चॅम्पियन
मॉडर्न डे क्रिकेटमधील ‘सबसे बडा बॉलर’ बनला रबाडा