भारतीय संघाची नवीन भिंत म्हणून ओळखला जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराने आज कसोटी क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण केल्या. भारताकडून ४००० धावा पूर्ण करणारा तो १५वा फलंदाज आहे.
हा विक्रम करून पुजाराने ५० कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय दिग्गज वीरेंद्रर सेहवाग, राहुल द्रविड आणि सुनील गावसकर यांच्या यादीत लिहले आहे.
पुजाराने २०१० मध्ये भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हा तो सलामीवीर म्हणून संघात खेळला होता, पण कालांतराने तो भारताचा पर्मनंट नंबर ३ बनला. त्याने मागील ७ वर्षात अनेक अप्रतिम खेळ्या केल्या आहेत ज्यामुळे भारताने अनेक सामनेच नाही तर मालिकाही जिंकल्या आहेत.
पुजाराने आपल्या कसोटी कारकिर्दीत ५२.१८ च्या सरासरीने ४००० धावा केल्या आहेत, ज्यात १५ शतके आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे.
५० कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू
४९४७ सुनील गावसकर, सरासरी ५७.५२
४१३५ राहुल द्रविड, सरासरी ५२.३४
४१०३ वीरेंद्र सेहवाग, सरासरी ५१.२८
४००० चेतेश्वर पुजारा, सरासरी ५२.६३
वेगवान ४००० धावा करणारे भारतीय खेळाडू
८१ डाव- सुनील गावसकर, वीरेंद्र सेहवाग
८४ डाव- राहुल द्रविड, चेतेश्वर पुजारा