भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नेथन लायनने उत्तम गोलंदाजी करत चेतेश्वर पुजाराला पहिल्या डावात बाद केले. 43 धावांवर उत्तम फलंदाजी करत असलेला पुजारा लायनच्या एका चेंडूवर लॅब्यूशानेकडे झेल देत बाद झाला. पुजारा विरुद्ध आपण केलेल्या गोलंदाजीबद्दल लायनने समाधान व्यक्त केले असून, आगामी सामन्यातही उत्तम रणनीतीने मैदानात उतरणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
मेलबर्न येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना लायन म्हणाला ,’मी आमच्या रणनीतीचा खुलासा येथे करणार नाही, पुजारा हा जागतिक दर्जाचा फलंदाज असून आगामी सामन्यात त्याला रोखण्यासाठी आम्हाला विशेष प्रयत्न करावे लागतील.’
लायन पुढे म्हणाला, ‘आम्ही मालिका सुरू होण्यापूर्वीच सर्व भारतीय फलंदाजांबद्दल उत्तम रणनीती आखली होती. ॲडीलेड येथे योजना यशस्वी ठरल्याने निश्चितच आनंद असणार आहे, पण आगामी सामन्यात नवीन रणनीती आखावी लागेल ‘.
लायनने आतापर्यंत आपल्या करिअरमध्ये पुजाराला तब्बल 10 वेळा बाद केलेले आहे. याच कामगिरीची पुनरावृत्ती मेलबर्न येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही तो करेल अशी ऑस्ट्रेलिया संघाला आशा आहे. लयानने स्पष्ट केले की विराट कोहली जरी पालकत्व रजा घेऊन भारतात परतला असला तरी भारतीय संघात विराटची जागा घेण्यासाठी अनेक दिग्गज फलंदाज आहेत.
लायनला विराटच्या अनुपस्थिती बद्दल प्रश्न विचारला असता तो म्हणाला, ‘भारतीय संघात अजिंक्य राहणे व चेतेश्वर पुजारा हे उत्तम फलंदाज आहेत . तसेच मयंक अग्रवाल व केएल राहुलसारखे युवा फलंदाज देखील विराटच्या अनुपस्थितीत त्याची जागा घेण्यासाठी सज्ज आहेत ‘.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरू होणार आहे. पालकत्व रजा घेऊन विराट भारतात परतणार असल्याने त्याच्या अनुपस्थित भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघात कोण घेऊ शकतो शमीची जागा, स्मिथने सांगितले नाव
थाटामाटात पार पडला युझवेंद्र चहल-धनश्री वर्माचा विवाहसोहळा, पहा फोटो अल्बम
ती म्हणाली, ‘फुलं मला आनंद देतात’ आणि केएल राहुलने थेट…
ट्रेंडिंग लेख –
स्लेजिंग करणार्यांना प्रत्युत्तर देताना भारतीय खेळाडूंनी केलेल्या ३ जबरदस्त खेळ्या
यावर्षी फक्त तुमचीच हवा! आंतराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ३ गोलंदाज