भारत विरुद्ध इंग्लंड या दोन संघात होणाऱ्या एक कसोटी सामन्यासाठीचा भारतीय संघ नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या संघात अनेक खेळाडूंना पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. चेतेश्वर पुजारा याला देखील या सामन्यात पुनरागमन करण्याची संधी आहे. भारतीय संघात संधी मिळाल्यानंतर पुजाराने मोठं भाष्य केले आहे. यामध्ये त्याने आयपीएलमध्ये न खेळल्याने आपल्याला फायदा झाल्याचे सांगितले आहे. चेतेश्वर पुजारा गेल्या काही वर्षांपासून पुजारा फॉर्ममध्ये नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता पुजारा चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असल्याचेही सांगितले.
चेतेश्वर पुजाराने काही काळापूर्वी काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी पुजाराने काउंटीच्या ७ डावांमध्ये चार शतक झळकावत आपली ओळख पुन्हा सिद्ध केली आहे. त्यामुळे पुजाराला भारतीय संघात पुनरागमन करण्यास फायदा झाला असल्याचे पुजारा सांगतो.
“जर मला कोणत्याही आयपीएल संघात निवडले असते, तर टी२० क्रिकेटमधील दिग्गज लोकांमध्ये मला फक्त नेट्समध्ये फलंदाजी करायला लागले असते. संघात स्थान मिळण्याबाबत शंका होती. त्याशिवाय काउंटीमध्ये खेळणे मला अधिक फायदेशीर ठरेल आणि त्याचा फायदा थेट सामन्यात दिसून येईल”, असा विश्वासही यावेळी पुजाराने व्यक्त केला.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेनंतर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोघांना संघातून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली होती. मात्र, आता बीसीसीआयने पुन्हा चेतेश्वर पुजारावर विश्वास दाखवत त्याला भारतीय संघात स्थान दिले आहे. अजिंक्य रहाणेला मात्र आपला फॉर्म दाखवण्याची संधी अजूनपर्यंत उपलब्ध झालेली नाही.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या बाबर आझमवर आयपीएलमध्ये ‘या’ टीमने लावले असते कोट्यवधी, अख्तरचा दावा
GTvsRR। बटलर ते मिलर, ‘या’ ५ खेळाडूंवर असणार सर्वांच्या नजरा, गाजवू शकतात पहिला क्वालिफायर सामना
‘भारतीय स्पीडगन’ उमरानचे टीम इंडियात निवड झाल्याबद्दल इरफान पठाणबरोबर खास सेलिब्रेशन, Video व्हायरल