---Advertisement---

कसोटीपटू चेतेश्वर पुजाराच्या घरी कन्यारत्नाचे स्वागत…

On: शुक्रवार, फेब्रुवारी 23, 2018 5:37 PM
---Advertisement---

भारतीय संघातील कसोटीपटू चेतेश्वर पूजाराला काल कन्यारत्न प्राप्त झाले आहे. काल त्याची पत्नी पूजा पुजारा हिने मुलीला जन्म दिला आहे. ही गोड बातमी त्याने स्वतः ट्विट करून दिली आहे.

त्याने त्याच्या मुलीबरोबरचा आणि पत्नीबरोबरचा फोटो शेयर करून लिहिले आहे, ” छोटी परी तुझे स्वागत आहे. माझ्या आयुष्यात नवीन भूमिका साकारण्यासाठी मी खूप उत्साही आणि आनंदी आहे. आम्ही जे मागितले होते ते आम्हाला मिळाले.”

पुजाराला जेव्हा मुलगी झाली तेव्हा तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये बडोदा विरुद्ध उपांत्यपूर्व सामन्यात खेळत होता. या सामन्यात पुजारा कर्णधार असणाऱ्या सौराष्ट्र संघाने बडोदा विरुद्ध ३ विकेट्सने विजय मिळवून उपांत्य सामन्यात प्रवेश केला आहे.

हा सामना संपल्यानंतर पुजारा त्याच्या मुलीला भेटण्यासाठी राजकोटला परतला आहे. तो रविवारी उपांत्य सामन्याच्या लढतीसाठी पुन्हा संघात सामील होईल.

पुजाराने २०१३ मध्ये पूजाशी लग्न केले आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच ट्विटवरून तो आणि त्याची पत्नी पालक होणार असल्याचे सांगितले होते. त्याला त्याच्या मुलीच्या जन्माबद्दल अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment