पुजाराच्या मते दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेन आणि मॉर्ने मॉर्केल आहेत सर्वांत कठीण गोलंदाज.
३ ऑगस्ट रोजी कोलंबो येथे भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे आणि रविचंद्रन अश्विनच्या नंतर आता चेतेश्वर पुजारा देशासाठी आपली ५०वी कसोटी खेळणार आहे.
५०व्या कसोटीबद्दल बोलताना पुजाराने त्याच्या या कारकीर्दीत खेळलेल्या सर्वात कठीण गोलंदाजांबद्दल अनुभव सांगितला आहे.
“माझ्या पदार्पणानंतर माझा पहिलाच दौरा २०११ला दक्षिण आफ्रिकेत होता. तेव्हा माझा सामना डेल स्टेन आणि मॉर्न मॉर्केलच्या वेगवान गोलंदाजीशी झाला. हा दौरा माझ्या कारकिर्दीतील सर्वात अवघड काळ होता.”
पुजाराने आपल्या कसोटी कारकिर्दीत ४९ सामने खेळले आहे. त्यात त्याने ५२. ८० च्या सरासरीने ३९६६ एवढ्या धावा केल्या आहेत. त्याने आपल्या कारकिर्दीत १५ अर्धशतके आणि १० शतके ही लगावली आहेत.
भारताच्या या नवीन वॉलने द्रविडची जागा पूर्णपणे भरून काढली आहे. मायदेशातील कसोटी मालिकेत तर त्याच्या फॉर्म नेहमीच चांगला राहिला आहे पण आता भारतीय संघाला त्याच्याकडून मायदेशा बाहेरील मालिकेत चांगली कामगिरीत करण्याची अपेक्षा आहे.