कोलंबो: येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या चेतेश्वर पुजाराने केएल राहुल पाठोपाठ अर्धशतकी खेळी आहे. पुजाराची ही १६वी अर्धशतकी खेळी आहे.
भारतीय संघाची नवीन भिंत म्हणून ओळखला जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराने आज कसोटी क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण केल्या. भारताकडून ४००० धावा पूर्ण करणारा तो १५वा फलंदाज आहे.
हा विक्रम करून पुजाराने ५० कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय दिग्गज वीरेंद्रर सेहवाग, राहुल द्रविड आणि सुनील गावसकर यांच्या यादीत लिहले आहे.
पुजाराने २०१० मध्ये भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हा तो सलामीवीर म्हणून संघात खेळला होता, पण कालांतराने तो भारताचा पर्मनंट नंबर ३ बनला. त्याने मागील ७ वर्षात अनेक अप्रतिम खेळ्या केल्या आहेत ज्यामुळे भारताने अनेक सामनेच नाही तर मालिकाही जिंकल्या आहेत.
पुजाराने आपल्या कसोटी कारकिर्दीत ५२.१८ च्या सरासरीने ४००० धावा केल्या आहेत, ज्यात १५ शतके आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे.