भारतीय संघातून (Team India) बाहेर असलेल्या चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) फलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी सुरूच ठेवली आहे. इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर पुजाराने रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) सामन्यात सौराष्ट्रकडून खेळताना छत्तीसगडविरूद्ध द्विशतक झळकावले. हे त्याचे प्रथम श्रेणी (First class) क्रिकेटमधील 18वे द्विशतक आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके झळकावणारा तो एकमेव भारतीय फलंदाज आहे, तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण सर्वाधिक द्विशतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.
चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) छत्तीसगडविरूद्ध 234 धावांची खेळी खेळली. त्याने 383 चेंडूंचा सामना करत 25 चौकार आणि 1 षटकार लगावला. पुजाराच्या या खेळीमुळे सौराष्ट्र संघाने छत्तीसगडविरूद्ध दमदार पुनरागमन केले. छत्तीसगडने 7 गड्यांच्या मोबदल्यात 578 धावा करून पहिला डाव घोषित केला होता.
प्रत्युत्तरात पुजाराच्या शानदार द्विशतकाच्या जोरावर सौराष्ट्राने खेळाच्या चौथ्या दिवशी 8 गडी गमावून 478 धावा केल्या आणि सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात पुजाराला शेल्डन जॅक्सन 62 धावा आणि अर्पित वासवडा 73 धावा यांची साथ लाभली.
चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) जून 2023 मध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना दिसला होता. या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
WTC FINALच्या बाहेर पडले ‘हे’ 4 संघ! उर्वरित सामने जिंकूनही नाही फायदा?
“बाॅर्डर-गावस्कर ट्राॅफी खेळणार पण…” पुनरागमनाबद्दल मोहम्मद शमी काय म्हणाला?
IND vs NZ; दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा रचणार इतिहास? या दिग्गजाला टाकणार मागे