भारतीय कसोटी संघाचा प्रमुख फलंदाज असलेला चेतेश्वर पुजारा सध्या इंग्लंडमध्ये आहे. तो ससेक्स काउंटी संघाकडून इंग्लंडमधील देशांतर्गत वनडे मालिकेत खेळतोय. शुक्रवारी (१२ ऑगस्ट) झालेल्या वॉर्विकशायर विरुद्धच्या सामन्यात त्याने एक झंझावाती शतक ठोकले. मात्र, त्याच्या वेगवान शतकानंतरही त्याचा संघ अगदी थोड्या फरकाने पराभूत झाला.
So so so close. 💔 Warwickshire win by 4 runs. 🏏 #SharkAttack pic.twitter.com/YSLCDjARUC
— Sussex Cricket (@SussexCCC) August 12, 2022
इंग्लंडमधील प्रमुख वनडे स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात वॉर्विकशायरने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा सलामीवीर रॉब याट्सने शानदार ११४ धावांची खेळी केली. त्याला विल रोड्सने ७६ व मायकेल बार्जसने ५८ धावा काढत साथ दिली. या सर्वांच्या योगदानाच्या जोरावर वॉर्विकशायरने ३१० धावा उभारल्या.
प्रत्युत्तरात, ससेक्सने २ बाद ११२ धावा अशी चांगली सुरुवात केली. टॉम क्लार्क बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर कर्णधार चेतेश्वर पुजारा फलंदाजीसाठी उतरला. नेहमी काहीशी संथ फलंदाजी करणाऱ्या पुजाराने आक्रमक धोरण स्वीकारले. त्याने अवघ्या ७४ चेंडूवर शतक पूर्ण केले. तो ७९ चेंडूवर ७ चौकार व २ षटकारांच्या मदतीने १०७ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या फलंदाजांना तितकी चांगली कामगिरी करता आली नाही. अखेरच्या चेंडूवर संघाला जिंकण्यासाठी सहा धावांची गरज असताना, केवळ एक धाव काढण्यात यश आल्याने ससेक्सला चार धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
पुजाराने यावर्षी ससेक्स काउंटी संघासाठी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पाच शतकांच्या मदतीने व १०९.४३ च्या सरासरीने ७६६ धावा केल्या होत्या. अखेरच्या दोन सामन्यात त्याला संघाचे नेतृत्व करण्याची देखील संधी लाभली होती. त्यानंतर आता या वनडे स्पर्धेतही कर्णधार म्हणून आपले योगदान देत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नव्या संघातही दिसणार लखनऊचे ‘हे’ सुपरजायंट्स
भारतासाठी कर्दनकाळ ठरू शकतात झिम्बाब्वेचे ‘हे’ दोघे खेळाडू, एकट्याने ठोकलीत सलग २ शतके
‘भारताविरुद्ध सामना खेळताना दबाव असतो!’ पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने केले स्पष्ट