भारतीय क्रिकेट संघाने नुकताच दक्षिण आफ्रिका दौरा केला होता. दौऱ्यातील कसोटी मालिकेत भारतीय संघाला आघाडीवर असूनही सलग दोन सामने गमावल्यामुळे २-१ असा पराभव पत्करावा लागलेला. भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) या मालिकेत अपयशी ठरला होता. यानंतर त्याला संघातून बाहेर करण्याची मागणी समोर येत होती. सातत्याने अपयशी ठरत असल्याने आता त्याला भारतीय संघातून बाहेर करण्याचे संकेत अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर आता आगामी रणजी ट्रॉफी (Ranji Trophy 2022) स्पर्धेसाठी त्याची सौराष्ट्र संघात निवड झाली आहे.
उनादकतच्या नेतृत्वात खेळणार पुजारा
दोन वर्षानंतर भारतातील सर्वात मोठी प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीची सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी जयदेव उनादकतच्या नेतृत्वात सौराष्ट्र संघ (Saurashtra Cricket Team) आपले विजेतेपद राखण्याचा प्रयत्न करेल. या संघात भारतीय संघाचा नुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा याला संधी देण्यात आली आहे. २१ सदस्यीय संघात याव्यतिरिक्त शेल्डन जॅक्सन, अर्पित वसावडा, चिराग जानी, कमलेश मकवाना व हर्विक देसाई या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा याला मात्र संघात स्थान मिळालेले नाही. याचाच अर्थ तो श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत भारतीय संघाचा भाग असू शकतो. (Cheteshwar Pujara Play Ranji Trophy)
खराब फॉर्ममध्ये आहे पुजारा
राहुल द्रविड याच्यानंतर ‘भारतीय क्रिकेटची भिंत’ म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा मागील जवळपास दोन वर्षापासून खराब फॉर्ममध्ये आहे. २०१९ पासून तो शतक झळकावू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेतही तो केवळ एक अर्धशतक ठोकू शकला होता. त्याचमुळे त्याने पुन्हा प्रथमश्रेणी क्रिकेट खेळून भारतीय संघात जागा बनवावी अशी मागणी केली जात होती.
रणजी ट्रॉफीसाठी सौराष्ट्र संघ-
जयदेव उनाडकत (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, शेल्डन जॅक्सन, अर्पित वसावडा, चिराग जानी, कमलेश मकवाना, हर्विक देसाई, धर्मेंद्रसिंह जडेजा, प्रेरक मंकड, चेतन सकारिया, विश्वराजसिंह जडेजा, केविन जीवराजानी, कुशराम पटेल, युवराज चुदास्मा, वीरेंद्र सिंग, देवांग करमटा, स्नेल पटेल, किशन परमार, आदित्य जडेजा.
महत्वाच्या बातम्या
केएल राहुलचे होणार पुनरागमन, तर कुलचा जोडी खेळणार एकत्र, अशी असू शकते दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग ११
आयपीएल २०२२ साठी एमएस धोनीने कसली कंबर, सरावाचा व्हिडिओ व्हायरल
युवा विश्वचषकात चमकदार कामगिरीनंतरही भारताचा ‘हा’ खेळाडू नाही आयपीएल लिलावाचा भाग, वाचा कारण