---Advertisement---

लॉर्ड्स कसोटीत चेतेश्वर पुजाराचा ‘आयकॉनिक’ सन्मान! तिसऱ्या दिवशी मिळाली ‘ही’ खास जबाबदारी!

On: शनिवार, जुलै 12, 2025 3:53 PM
---Advertisement---

Cheteshwar Pujara Honored At Lords: सध्या भारत आणि इंग्लंड संघातील तिसरा कसोटी सामना लाॅर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर रंगला आहे. दरम्यान हा सामना रोमांचक वळणावर उभा आहे. खेळाच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ आपला पहिला डाव पुढे नेण्यासाठी मैदानात उतरेल. याच दरम्यान, भारतीय संघाचा माजी खेळाडू चेतेश्वर पुजाराला या ऐतिहासिक मैदानावर एक मोठा सन्मान मिळाला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी 5 मिनिटांसाठी त्याला आयकॉनिक बेल वाजवण्याची संधी दिली मिळाली. (Cheteshwar Pujara Lords Bell) याचसोबत तो त्या निवडक भारतीय खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे ज्यांना हा सन्मान मिळाला आहे. यापूर्वी, याच सामन्याच्या पहिल्या दिवशी ‘क्रिकेटचा देव’ मानले जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला याने सन्मानित करण्यात आले होते. (Sachin Tendulkar Lords Bell)

भारतीय संघासाठी दीर्घकाळ नंबर 3 च्या स्थानावर खेळलेल्या पुजाराची कारकीर्द खूपच शानदार राहिली आहे. त्याने भारतीय संघासाठी 103 कसोटी सामने खेळताना 7 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. या काळात त्याने 19 शतकांसह 35 अर्धशतके झळकावली आहेत. 2012 मध्ये दीप्ती शर्मा ही आयकॉनिक बेल वाजवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती. (Pujara Test career stats)

लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाच्या फलंदाजांवर सर्वांच्या नजरा असतील. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 3 विकेट्स गमावून 145 धावा केल्या होत्या. केएल राहुल आणि रिषभ पंत क्रीजवर टिकून आहेत. राहुलने अर्धशतक झळकावले असून तो 53 धावांवर नाबाद आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 387 धावा केल्या आहेत. दरम्यान भारतीय संघाची नजर आघाडी घेण्यावर असेल. (India vs England 3rd Test Day 3)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---