अॅडलेड। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताकडून चेतेश्वर पुजाराने 123 धावांची खेळी केली. त्याच्या शतकी खेळीने भारताला पहिल्या डावात सर्वबाद 250 धावसंख्या उभारता आली.
सामन्याचा पहिला दिवस संपल्यावर पुजाराने त्याला फलंदाजी करताना कोणता त्रास जाणवला याचे स्पष्टीकरण दिले. येथील वातावरण कठीण, उष्ण असल्याने भारतापेक्षा वेगळेच आहे असे पुजाराने म्हटले आहे.
“भारतात आम्ही क्रिकेटचे अनेक सामने खेळले आहे. मात्र ऑस्ट्रेलियामधील हवामान वेगळेच आहे. सुरूवातील फलंदाजी करताना त्याचा थोडा त्रास जाणवला पण नंतर जम बसल्यावर चांगले शॉट्स मारता आले. अश्विन बाद झाल्यावर मी माझ्या खेळीत वेग आणत चांगले शॉट्स खेळले. ही माझी कसोटी क्रिकेटमधील आतापर्यंतची उत्तम खेळी आहे”, असे पुजाराने बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हीडिओमध्ये सांगितले आहे.
येथील वातावरण उष्ण आणि दमट असल्याने मला त्याचा त्रास जाणवला आहे. यासाठी मी फिजिओला भेटणार आहे. तसेच मी आइस बाथही घेणार हे त्याने सांगितले आहे.
“मी चॉकलेट मिल्कशेकचा मोठा चाहता आहे. मिल्कशेक पिल्यावर माझा थकवा दूर होतो. तसेच त्यामधील प्रोटीन्सचाही फायदा होऊन दुसऱ्या दिवशी मी परत मैदानावर येऊन क्षेत्ररक्षण करण्यास मदत होते “, असे पुजारा म्हणाला.
Why @cheteshwar1 wants a 'milkshake' post his Adelaide ton.
Man of the moment does a quick walkie talkie in under a minute post his energy sapping ton at Adelaide – by @28anand
▶️▶️https://t.co/6lk6v6Z7bd #AUSvIND pic.twitter.com/rP1wVSRP0K
— BCCI (@BCCI) December 6, 2018
याआधी नाणेफेक जिंकल्यावर भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताचे फलंदाज स्वस्तात बाद झाले तर पुजाराने 246 चेंडूत 123 धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या:
–अश्विनने त्रिफळाचीत केलेल्या शॉन मार्शने मोडला 130 वर्षांचा नकोसा असा विक्रम
–चेतेश्वर पुजाराच्या ‘स्टिव्ह’ या टोपन नावामागचे रहस्य शेन वॉर्नने उलगडले
–चेतेश्वर पुजाराने या १० गोलंदाजांच्या चेंडूवर मारले आहेत षटकार