आज सौराष्ट्र विरुद्ध झारखंड रणजी सामन्यात चेतेश्वर पुजाराने द्विशतकी खेळी करताना भारतीय क्रिकेटमधील अनके दिग्गजांचे विक्रम मोडले. चेतेश्वर पुजाराची ही प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १२ वी द्विशतकी खेळी होती.
प्रथम श्रेणी क्रिकेट म्हणजे ३ किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांचे क्रिकेट. यात कसोटी क्रिकेटचाही समावेश होतो. पुजाराने कसोटी आणि देशांतर्गत क्रिकेटमधील रणजी स्पर्धा असे मिळून १२ द्विशतके केली आहेत.
यापूर्वी भारताकडून हा विक्रम विजय मर्चंट यांच्या नावावर होता. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ११ द्विशतके केली होती. तर विजय हजारे, सुनील गावसकर आणि राहुल द्रविड यांनी प्रत्येकी १० शतके केली आहेत.
कुमार श्री रणजितसिंहजी यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १४ द्विशतके केली आहेत परंतु ते भारत किंवा भारतातील संघाकडून खेळले नाहीत.
पुजाराच्या १२ द्विशतकांपैकी ३ त्रिशतके आहेत. आशियातील केवळ कुमार संगकारा (१३), जावेद मियाँदाद (१२) आणि युनिस खान (१२) यांना अशी कामगिरी करता आली आहेत.
पुजाराच्या १२ द्विशतकांपैकी ६ द्विशतके त्याने सौराष्ट्रसाठी, ३ भारतासाठी, २ इंडिया असाठी आणि एक दुलीप ट्रॉफीमध्ये केले आहे. विशेष म्हणजे ही सर्व द्विशतके त्याने गेल्या १० वर्षात केली आहेत.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक त्रिशतके करणाऱ्याचा भारतीय विक्रमही चेतेश्वर पुजारा (३) आणि रवींद्र जडेजा (३) यांच्या नावावर आहे.