भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा याला ‘कसोटी स्पेशलिस्ट’ म्हणून ओखळले जाते. हा ३२ वर्षीय शिलेदार मैदानावर अतिशय धिम्या गतीने बचावात्मक फलंदाजी करताना दिसतो. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याची अशीच एक खेळी पाहायला मिळाली आहे.
पुजाराने सिडनी कसोटीत केले सर्वात हळूवार शतक
पुजाराने या सामन्यातील पहिल्या डावात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत कसोटी कारकिर्दीतील २६वे अर्धशतक केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने टीम पेनच्या हातून त्याला झेलबाद केले. मात्र पुजाराने हे अर्धशतक करण्यासाठी तब्बल १७४ चेंडूंचा सामना केला. यादरम्यान त्याने ५ चौकार ठोकले. हे पुजाराचे आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वात हळूवार अर्धशतक तर ठरले.
पुजाराने यापुर्वी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी सामन्यात १७३ चेंडूत कारकिर्दीतील सर्वात संथ अर्धशतक पूर्ण केले होते. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने आपलाच विक्रम मोडला आहे.
तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलिया संघ आघाडीवर
ऑस्ट्रेलिया संघाने ३३८ धावा पहिल्या डावात केल्या. त्यानंतर भारतीय संघाकडून पहिल्या डावात पुजारानंतर कोणताही फलंदाज अर्धशतक करेपर्यंतही मैदानावर टिकू शकला नाही. भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे २२ धावांवर त्रिफळाचीत झाला. तर रिषभ पंत ३६ धावा आणि रविंद्र जडेजा नाबाद २८ धावा करु शकला. तत्पुर्वी सलामीवीर शुबमन गिलने ५० धावा आणि रोहित शर्माने २६ धावांचे योगदान दिले होते. त्यामुळे भारतीय संघ पहिल्या डावात २४४ धावा करु शकला आणि ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ९४ धावांनी आघाडी घेतली.
त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाखेर २ बाद १०३ धावा केल्या आहेत. अशाप्रकारे तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलिया संघ भारतापेक्षा १९७ धावांनी आघाडीवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अरे बापरे! ‘या’ भारतीय फलंदाजांनी कसोटीत खेळलेत १३ हजारपेक्षाही जास्त चेंडू, पुजाराचाही समावेश
खरं की काय? रिषभ पंतने ‘या’ रेकाॅर्डमध्ये सर विवियन रिचर्ड्स यांनाही मागे टाकलंय; वाचा पराक्रम
अरे पळा पळा…! टीम इंडियाचे ‘हे’ 3 पठ्ठे असे झाले रनआऊट, व्हिडिओ पाहून डोक्याला हात लावाल