आशिया चषकाच्या (Asia Cup) 15व्या हंगामात भारतीय संघ गुरूवारी (8 सप्टेंबर) शेवटचा सामना खेळला. अफगाणिस्तान विरुद्धचा हा सामना दुबई येथे खेळला गेला. यामध्ये भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने सलामीला येत स्फोटक फलंदाजी केली. त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले-वहिले टी20 शतक झळकावले. यामुळे त्याने सलामीलाच फलंदाजी करावी याला जोर चढत आहे, तर भारतीय कसोटी संघाचा महत्वाचा खेळाडूने चकीत करणारे विधान केले आहे.
भारतीय कसोटी संघाची अभेद्य भिंत म्हणजेच चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याचे विराट कोहली (Virat Kohli) याने सलामीला फलंदाजी नाही करावी असे मत व्यक्त केले आहे. विराटने आगामी टी20 विश्वचषकात तिसऱ्या क्रमांकावरच फलंदाजी करावी असेही त्याने म्हटले आहे.
आशिया चषकाच्या भारताच्या शेवटच्या सामन्यात संघ केएल राहुल (KL Rahul) याच्या नेतृत्वाखाली खेळला. यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या अनुपस्थितीत विराट सलामीला फलंदाजी करण्यास आला. त्याने जबरदस्त फलंदाजी करत 200च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. त्याने 61 चेंडूत 12 चौकार आणि 6 षटकाराच्या साहाय्याने नाबाद 122 धावा केल्या आहेत.
पुजारा इएसपीएन क्रिकइन्फोशी विराटच्या खेळीविषयी बोलत होता. तो म्हणाला, त्याने सलामीला यावे असे मला नाही वाटत. तो तिसऱ्या क्रमांकासाठी योग्य आहे. तसे त्याने सिद्धही केले आहे. केएल राहुल आणि रोहित शर्मा सलामीसाठी बरोबर आहेत. यामुळेच विराटने तिसऱ्या क्रमांकावरच फलंदाजी करावी. त्याने या क्रमांकावर अधिक धावा केल्या आहेत.
रोहित जेव्हापासून भारताचा कर्णधार झाला आहे तेव्हापासून फलंदाजी क्रमवारीत अनेक बदल दिसले आहेत. राहुलच्या अनुपस्थितीत इशान किसन, रिषभ पंत आणि सूर्यकुमार यादव यांनीही ओपनिंगला फलंदाजी केली आहे. मात्र यांना सतत पहिल्या दोन क्रमांकावर फलंदाजीसाठी नाही पाठवले गेले. राहुल हा दुखापतीतून सावरला. पण आशिया चषकात त्याची कामगिरी निराशाजनक झाली आहे.
आशिया चषकानंतर भारत घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषक खेळला जाणार आहे. अशातच रोहितसोबत कोणाला सलामीला पाठवावे याबाबत लवकरात लवकर निर्णय बोर्डला घ्यावा लागणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जडेजाच्या विरोधात रचला गेला कट? ‘त्यामुळे’ नाही खेळणार टी-20 विश्वचषक
मोठी बातमी: टी20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार करणार निवृत्तीची घोषणा
VIDEO | हे काय? पाकिस्तानी चाहत्यांची कुटाई केली, पण भारतीयांच्या गळ्यात पडून सामना पाहत होते अफगाणी चाहते