भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर विशाखापट्टणम कसोटीच्या पहिल्या डावात अपेक्षित खेळी करू शकले नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून मालिकेतील दुसरा कसोटी सामना वायझॅक स्टेडियमवर खेळला जात आहे. या मालिकेसाठी काही वरिष्ठ खेळाडूंना भारतीय संघाकडून संधी मिळाली नाहीये. याच पार्श्वभूमीवर रवी शास्त्री यांनी मोठे विधान केले आहे.
भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाखेर भारताने 6 विकेट्सच्या नुकसानावर 166 धावा केल्या. यशस्वी जयस्वाल याने 179* धावांची खेळी केली. दुसऱ्या दिवशी जयस्वाल आपले पहिले आंतरराष्ट्रीय द्विशतक पूर्ण करण्याची शक्यता आहे. असे असले तरी, शुबमन गिल (Shubman Gill) आणि श्रेयस अय्यर या प्रमुख खेळाडूंनी सुमार प्रदर्शन केले. गिल 34, तर अय्यर 27 धावा करून बाद झाले. याच पार्श्वभूमीवर रवी शास्त्रींनी चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याची आठवण काढली. शास्त्रींच्या मते युवा खेळाडूंनी चांगले प्रदर्शन करणे गरजेचे आहे. त्यांना चांगले प्रदर्शन जमत नेसल, तर पुजारासारखे केळाडू संघाबाहेर वाट पाहत आहेत.
भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात रवी शास्त्री समालोचकाची भूमिका पार पाडत आहे. लाईव्ह सामन्यात बोलताना रवी शास्त्रींनी युवा खेळाडूंना सुचना केल्याचे पाहायला मिळाले. शास्त्री म्हणाले, “हा संघ अजून नवीन आहे. युवा आहे. या खेळाडूंना स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे. विसरू नका बाहेर पुजारा वाट पाहत आहे. तो रणजी ट्रॉफीमध्ये मेहनत करत आहे.”
Ravi Shastri said, “you shouldn’t forget Cheteshwar Pujara is waiting as well. He’s grinding at the Ranji Trophy and scoring runs”. pic.twitter.com/le8fNTw0l7
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 2, 2024
(Cheteshwar Pujara waiting, former veteran warns Shubman Gill and Shreyas Iyer)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, कुलदीप यादव
इंग्लंड – झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रुट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.
महत्वाच्या बातम्या –
Poonam Pandey death । न्यूड होणार होती बॉलिवूड अभिनेत्री, 2011 विश्वचषकात रातोरात झाली होती फेमस
ENG vs IND । रोहित पुन्हा ठरला फुसका बॉम्ब! ‘या’ कारणास्तव धावा करण नाहीये कर्णधार