इंडियन प्रीमीयर लीगमध्ये खेळण्याची युवा क्रिकेटपटूंपासून ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या अनेक क्रिकेटपटूंची इच्छा असते. भारतीय क्रिकेट संघाची नवी भिंत म्हणून ओळखला जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराला देखील पुन्हा एकदा इंडियन प्रीमीयर लीगमध्ये खेळायचं आहे.
पुजारा म्हणाला की जर मला संधी मिळाली तर मी स्वतःला नक्कीच सिद्ध करेन. ब्रिस्बेन कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात पुजाराने खेळलेला ५६ धावांच्या डावांचे कौतुक सर्वत्र झाले, पुजाराची कामगिरी भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये खूपच प्रभावी आहे. उजव्या हाताच्या या फलंदाजाने २००८ ते २०१४ या काळात आयपीएल खेळले आहे, पण त्यानंतर त्याच्यासाठी कोणत्याही संघाने रस दाखवला नाही.
३३ वर्षीय चेतेश्वर पुजारा याने यापूर्वी अनेक वेळा लिलावासाठी आपल्या नाव दिलं होतं, परंतु २०१४ पासून तो विकला जात नाही आहे. परंतु त्याने पुन्हा एकदा आयपीएलमध्ये खेळायचा निर्णय घेतला आहे.
पुजाराने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून केली. त्यानंतर २०११ मध्ये तो रॉयल चॅलेंजेस बेंगलोरच्या संघात सामील झाला. पुढे २०१३ च्या आयपीएल लिलावात त्याला किंग इलेव्हन पंजाब विकत घेतले होते, पण पुढच्या मोसमाच्या आधीच त्याला सोडण्यात आले, तथापि पुजाराने हार मानली नाही आणि यावेळी त्यांनी आपले नाव पुन्हा एकदा लिलावासाठी दिले आहे.
चेतेश्वर पुजारा पुढे म्हणाला की ‘मला नक्कीच आयपीएलचा भाग व्हायचे आहे, मला फक्त एक संधी हवी आहे, मला खात्री आहे की मी या लीगमध्ये अधिक चांगली कामगिरी करु शकेन. मला फक्त चांगली कामगिरी करावी लागेल आणि मी माझी वेळ येण्याची वाट पाहिल. मला सर्व स्वरूपात खेळायला आवडेल. जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल, तेव्हा तेव्हा मी माझी प्रतिमा नक्कीच बदलेन.’
पुजाराने आतापर्यंत फक्त ३० आयपीएल सामने खेळले आहे. त्यात त्याने ९९.७४ च्या स्ट्राईक रेट ने ३९० धावा केल्या आहेत. याच कालावधीत पुजाराचा सरासरी २०.५३ इतकी आहे. त्याचप्रमाणे आत्तापर्यंत अ दर्जाचे १०३ सामने खेळले आहेत आणि ५४.२० च्या सरासरीने ४४४५ धावा केल्या आहेत ज्यात ११ शतके आणि २९ अर्धशतकांचा यात समावेश आहे.
तो म्हणाला की ‘मला असं वाटत नाही की, माझ्याकडे हे नाही आहे आणि माझ्याकडे हे आहे. माझ्याकडे जे आहे त्यात मी आनंदी आहे. मी इंडियन ऑइलच्या वतीने ऑफिस क्रिकेट खेळत असो की सौराष्ट्रसाठी रणजी करंडक माझी वचनबद्धता नेहमी शंभर टक्के असते. माझी वचनबद्धता खेळाशी आहे मी भारताकडून अनेक सामने जिंकले आहेत, त्याचप्रमाणे आयपीएलमध्ये जर मला संधी आली तर मी नक्कीच त्या संधीचं सोनं करेन.
महत्त्वाच्या बातम्या –
टॉप ४ : भारतात पदार्पण केलेले इंग्लंडचे खेळाडू, ज्यांना पुढे दिग्गज म्हणून ओळखले गेले