भारतीय कसोटी संघाची ‘न्यू वॉल’ म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा उद्या भारताकडून ५०वा कसोटी सामना खेळणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात आर अश्विनने ५०वा कसोटी सामना खेळाला तर उद्याच्या सामन्यात पुजारा हा अनोखा विक्रम करत आहे.
चेतेश्वर पुजारने २०१० साली ९ ऑक्टोबर रोजी बेंगलोर येथे कसोटी पदार्पण केले होते. एमएस धोनीच्या नेतृत्वखालील खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्याने पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात ७२ धावा केल्या होत्या.
पुजाऱ्याच्या नावावर सध्या ४९ कसोटीमध्ये ५२.१८च्या सरासरीने ३९९६ धावा आहेत. त्यात त्याने १२ शतके आणि १५ अर्धशतके केली आहेत.
उद्या आर प्रेमदासा स्टेडियम कोलंबो येथे होणारा सामना पुजाराचा ५०वा सामना असला तरी संघातील अन्य खेळाडूंमधील इशांत शर्मा, विराट कोहली आणि आर अश्विन हे खेळाडू यापूर्वी ५० कसोटी सामने भारताकडून खेळले आहेत.